घरताज्या घडामोडीHumble One:पेट्रोल-डिझेलवर नाही तर सौरऊर्जेवर चालते ही कार, हंबल मोटर्सकडून नवीन कार...

Humble One:पेट्रोल-डिझेलवर नाही तर सौरऊर्जेवर चालते ही कार, हंबल मोटर्सकडून नवीन कार जारी

Subscribe

वाहन उत्पादक कंपन्यांच्या संशोधनाचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन मोटारीनंतर सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार बनवण्याच्या दिशेने काम करत आहेत. यामध्ये कॅलिफोर्निया स्टार्टअप कंपनी Humble Motorsने सौरऊर्जेवर चालणारी कार Humble One सादर केली आहे. या वाहनाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार असून सूर्यप्रकाशामुळे वाहनाची बॅटरी चार्ज होणार आहे.

या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारसाठी सुमारे ८० लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर इच्छुक ग्राहक हे वाहन २२ हजार रुपयांना बुक करू शकतात. कंपनी गेल्या दोन वर्षांपासून या कारवर काम करत आहे आणि ही जगातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार आहे.

- Advertisement -

कंपनीचे म्हणणे आहे की, कारच्या उत्पादनाला २०२४ मध्ये सुरूवात होणार आहे. यावेळी २०२५ मध्ये वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. या कारला इलेक्ट्रिक कारच्या जगातला एक मोठा आविष्कार म्हटले जात आहे. Humble One कार ही पाच सीटर SUV कार आहे. या कारच्या छतावर फोटोव्होल्टेइक सेलने बनवलेले 82.35 स्क्वेअर फूट आकाराचे सोलर पॅनल देण्यात आले आहे. Humble One कारची मोटर 1020hp जनरेट करण्यास सक्षम आहे.

किती किमीचा करू शकता प्रवास?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणाच्या समस्येच्या काळात ही कार खूपच प्रभावी ठरणार आहे. ग्राहकांसाठी हा एक आशेचा नवा किरण आहे. Humble Oneचा दावा आहे की, Humble One इलेक्ट्रिक SUV एका चार्जवर ८०५ किमी पर्यंत प्रवास करेल. दुसरीकडे, जर आपण त्याच्या श्रेणीबद्दल बोलायचे झाले तर सोलर मोडमध्ये ही कार सुमारे ९६ किमी धावू शकते.

- Advertisement -

हेही वाचा :महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त अन् कारभार काढून घेण्यासाठी मोठा संघर्ष, त्रास होईल, परंतु घाबरू नका, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -