घरCORONA UPDATEअमेरिकेत वर्षभरापासून शेकडो कोरोना मृतदेह ट्रक मधे पडून, अंत्यविधी चे Waiting संपेना

अमेरिकेत वर्षभरापासून शेकडो कोरोना मृतदेह ट्रक मधे पडून, अंत्यविधी चे Waiting संपेना

Subscribe

लवकरच त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लाखांच्या घरात आहेत. २०२१मध्ये ब्राझील या देशाला कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. ब्राझील त्यानंतर अमेरिका आणि भारत सर्वाधिक कोरोनाच्या विळख्यात सापडलेले देश आहेत. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये स्मशानभूमीत मृतदेहाचे अक्षरश: खच पडले आहेत. अशीच परिस्थिती २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत अमेरिकेची होती. अमेरिकेची परिस्थिती भयाण झाली होती. त्याच अमेरिकेतून आता एक धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह फ्रीजर ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. त्या मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. त्यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने मृतदेह शवागारात ठेवण्यात आले होते. गेल्या एक वर्षांपासून मृतदेह शवागार पडून आहेत. मात्र आता लवकरच त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात गेली होती. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. त्याचप्रमाणे अनेक रुग्णांच्या कुटुंबियांना मृतांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करायचे होते. स्थानिक प्रशासन या मृतांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. हार्ट आइसलँड हे न्ययॉर्कमधील सर्वात मोठे कब्रस्तान आहे. या कब्रस्तानात मागच्या एक वर्षांपासून अंत्यविधीची वाट पाहणाऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

अमेरिकेत आतापर्यंत सहा लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजही ब्राझील नंतर सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत अमेरिकेचा दुसरा क्रमांक आहे. भारतात ब्राझील आणि अमेरिकेच्या तुलनेत जरा बरी परिस्थिती पहायला मिळत आहे. अमेरिकेच्या या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आजही अमेरिकेसारख्या मोठ्या देशावर कोरोनाची टांगती तलवार कायम आहे.


हेही वाचा – coronavirus new variant: नव्या व्हेरियंटला ‘भारतीय’ म्हटल्यानंतर केंद्राचा आक्षेप; म्हणाले WHO संदर्भातील ते वृत्त खोटे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -