LockDown: उपासमारीने मजूर महिला बेशुद्ध; कॉन्स्टेबलने रक्त देऊन वाचवला जीव

वेळेत रक्त मिळाल्यामुळे या मजूर महिलेचा जीव वाचण्यास मदत झाली.

प्रातिनिधिक फोटो

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पायी प्रवास करत असणाऱ्या मजूर महिलेची अचानक शुद्ध हरपली. या मार्गावरून जात असणाऱ्या मध्य प्रदेश पोलिसांचे लक्ष या महिलेकडे जाता त्यांनी तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपाशी आणि थकला जाणवल्यामुळे या महिलेची अवस्था गंभीर झाली होती. देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्याने बाहेर सगळी वाहतूक बंद असल्याने ही महिला पायी प्रवास करत निघाली होती. त्यावेळी चक्कर येऊन पडल्याने पोलिसांनी उपचारासाठी रूग्णालयात नेले असता तिला रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोणताही विचार न करता एका पोलीस कॉन्स्टेबलने या मजूर महिलेला आपले स्वतःचे रक्त देऊन तिचा जीव वाचवला.


हेही वाचा – Corona Live Update – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २३२वर, मुंबईत ४ नवे रुग्ण!

बऱ्याच दिवसांपासून उपाशी होती ही मजूर महिला

मध्य प्रदेशातील देवास येथे राहणाऱ्या महिलेला अनेक दिवसांपासून अन्न न मिळाल्याने ती उपाशी होती. त्यामुळे तिला अशक्तपणा आला असतानाही ती मजूर महिला राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या घरी पायी चालत जात होती. लॉकडाऊन असल्यामुळे चालत घरी पोहोचण्याशिवाय तिच्याकडे पर्यांय नव्हता. दरम्यान लॉकडाऊनमुळे मजुरीही बंद झाल्याने पैशांची चणचण देखील तिला होती. अशा अवस्थेत भर दुपारी रस्त्यात चक्कर रस्त्यावर कोसळली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धर्मेंद्र यांनी रुग्णालयात उपचारासाठी महिलेला दाखल केलं.

वेळेत रक्त मिळाल्यामुळे महिलेचे वाचले प्राण

कॉन्स्टेबल धर्मेंद्र यांनी मजूर महिलेला योग्य वेळी रूग्णालयात दाखल केले. तिला रक्ताची आवश्यकता असल्याने स्वतःचे रक्त लगेच त्या महिलेसाठी दिले. वेळेत रक्त मिळाल्यामुळे या महिलेचे प्राण वाचले.