घरदेश-विदेशसर्वात कमी वयाच्या भारतातील 'या' श्रीमंत व्यक्ती, Hurun India ने जाहीर केली...

सर्वात कमी वयाच्या भारतातील ‘या’ श्रीमंत व्यक्ती, Hurun India ने जाहीर केली श्रीमंतांची लिस्ट

Subscribe

कोरोना काळात देशात आर्थिक संकटात असताना भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. हुरुण इंडियाने नुकतीच देशातील ४० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यात मीडिया नेटचे संस्थापक दिव्यांक तुराखिया ४० वयापेक्षा कमी वय असणारे भारतातील सर्वात श्रीमतांपैकी एक ठरले आहे. त्यांची एकूण संपत्ती 12,500 कोटी रुपये इतकी आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुण इंडिया ४० अँड एंडर सेल्फ मेड रिच लिस्ट २०२१ (IIFL Wealth and Hurun India)मध्ये सहभागी ४५ हून अधिक हे स्टार्टअप उद्योजक आहेत.

यातील प्रत्येकाची संपत्ती IIFL Wealth and Hurun India च्या आकडेवारीनुसार, १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यात ब्राऊजस्टॅकचे सह-संस्थापक नकुल अग्रवाल (३८) आणि रितेश अरोडा (३७) जवळपास १२, ४०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह IIFL Wealth and Hurun India List मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. यंदा IIFL Wealth and Hurun India च्या यादीत ३१ नवे उद्योजक सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

यात पालो आल्टोचे कॉनफ्लूएंटच्या नेहा नारखेडे आणि परिवार १२,२०० कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर पोहचल्या आहेत. IIFL Wealth and Hurun India च्या यादीत ओलाचे मालक भाविश अग्रवाल यांचेही नावे आहे. यावर्षी भाविश यांच्या संपत्ती १५ सप्टेंबरपर्यंत दुप्पट झाली असून ती ७,५०० कोटी रुपयांवर पोहचली आहे. भाविश अग्रवाल IFL Wealth and Hurun Indiaत च्या य़ादीत नवव्या स्थानावर आहेत. तर फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यात आठव्या स्थानावर आहेत.

बंगलुरु शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणतात. IIFL Wealth and Hurun India यादीतील ४५ नावांपैकी ४२ नावे याच शहरातील आहेत. यंदा IIFL Wealth and Hurun India मध्ये सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्राचे सर्वाधिक योगदान देते. त्यानंतर अनुक्रमे परिवहन आणि लॉजिस्टिक्स, मनोरंजन आणि आर्थिक सेवांचा क्रमांक येतो.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -