Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! मृतदेहावर खुर्ची टाकून नवरा सांगू लागला बायकोच्या हत्येची कहाणी

धक्कादायक! मृतदेहावर खुर्ची टाकून नवरा सांगू लागला बायकोच्या हत्येची कहाणी

आसपासच्या परिसरातील लोकांना हा प्रकार समजताच लोकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Related Story

- Advertisement -

व्यसनाच्या आहारी गेलेले लोक काहीही करू शकतात हे खरं. हरियाणामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बायकोने नशा करण्यापासून रोखल्यामुळे नवऱ्याने बायकोची गळा चिरून हत्या केली. तिच्या मृतदेहावर खुर्ची ठेवून बायकोच्या हत्येची कहाणी सांगू लागला. हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसपासच्या परिसरातील लोकांना हा प्रकार समजताच लोकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बायकोची गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी आरोपी सोनू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीवरून असे समोर आले आहे की, आरोपी सोनू हा बायकोवर तिच्या चारित्र्यावरून संशय घेत होता. आरोपीला दारूचे व्यसन होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचे समजते.

- Advertisement -

आरोपी सोनू वर्मा हा ट्रक ड्रॉइवर होता. गेल्या चार महिन्यांपासून सोनू रमेश कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी संजना २६वर्षांची एक मुलगी आणि १ वर्षाचा मुलगा राहत होते. आरोपीच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनू याला दारूचे व्यसन होते. तिची आई नेहमी वडिलांना दारू पिण्यापासून रोखत असे त्यावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. शनिवारी रात्री वडिल नेहमीप्रमाणे दारू पिऊन आले. त्यांनी आईला मारहाण करायला सुरूवात केली. रात्रभर ते आईला त्रास देत होते. सकाळी आई जेवण बनवत असताना वडिलांनी मागून आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. मुलीने हा सर्व प्रकार पाहून ती घाबरून ओरडत घराच्या बाहेर आली.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची मुलगी ओरडत घराबाहेर आली. शेजारी मुलीला घेऊन घरात गेले तर खोलीत सोनू मरण पावलेल्या बयाकोच्या अंगावर खुर्ची ठेवून बसला होता. माझ्या बायकोचे अनैतिक संबंध होते म्हणून मी तिचा गळा चिरून तिला मारून टाकले, असे तो सगळ्यांना सांगत होता. मी पळून जाणार नाही आणि मी पोलिसांनाही घाबरत नाही, असे तो म्हणत होता. हा धक्कादायक प्रकार पाहिल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर कारवाई करून त्याला अटक केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – ‘त्या’ तिघांनी मोक्षप्राप्तीसाठी केली आत्महत्या?

 

- Advertisement -