घर क्राइम सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी पतीला अटक; काय होती प्लॅनिंग?

सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी पतीला अटक; काय होती प्लॅनिंग?

Subscribe

नवी दिल्ली : नोएडातील (Noida) सेक्टर 30 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 61 वर्षीय महिला वकील रेणू सिन्हा (Renu Sinha) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या बाथरूममध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. महिला वकीलाच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या तिच्या पतीला त्यांच्याच घरातून अटक करण्यात आली आहे. (Husband arrested in connection with murder of Supreme Court woman lawyer What was the planning)

सर्वोच्च न्यायालयातील महिला वकील रेणू सिन्हा या मूळच्या बिहारच्या पाटणा येथील रहिवासी होत्या. त्या त्यांच्या पतीसोबत नोएडा येथील सेक्टर 30 मध्ये राहत होत्या. रेणू सिन्हा या कर्करोगाने त्रस्त होत्या. तसेच त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या भावाचा फोन उचलत नव्हता. त्यामुळे आपल्या बहिणीची काळजी वाटू लागल्याने रेणू सिन्हा यांच्या भावाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार कोतवाली सेक्टर-20 पोलीस चौकशी करण्यासाठी रेणू सिन्हा यांच्या घरी पोहचले. मात्र घराचा दरवाजा कोणीच उघडला नाही. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. यावेळी घराची झाडाझडती घेतली असताना रेणू सिन्हा यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत त्यांच्या बाथरूममध्ये आढळून आला. त्याच्या डोक्यावर जखमा आढळल्या. यानंतर रेणू सिन्हा यांच्या कुटुंबीयांनी नितीन सिन्हा यांच्यावर हत्येचा आरोप केला. तसेच रेणू सिन्हा यांच्या हत्येनंतर त्याचा पतीसुद्धा बेपत्ता होता. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपासणी सुरू केली.

- Advertisement -

हेही वाचा – चंद्र-सूर्य झाला आता खोल पाण्यातील रहस्य उलगडण्याची तयारी; ‘समुद्रयान’ मोहिमेची चाचपणी सुरू

पोलिसांनी रेणू सिन्हा यांचा मृतदेह ताब्यात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पुढील चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी नितीन सिन्हा यांना आरोपी मानत पुढील तपास सुरू केला. यावेळी त्यांना घरात सीसीटीव्ही कॅमेर आढळून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर गायब असल्याचे निर्दशनास आले. यानंतर पोलिसांनी घराशेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असताना त्यांनी रेणू सिन्हा यांचा पती नितीन सिन्हा घराच्या बाहेर पडताना कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे घरातच लपून बसल्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी घरातील प्रत्येक खोलीची झडती घेतली.

- Advertisement -

रात्री तीनच्या सुमारास पोलिसांनी आरोपी वकीलाला घरातून अटक केली. पती घराच्या स्टोअर रूममध्ये लपून बसला होता. मालमत्तेच्या वादातून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय आपले घर विकून परदेशात पळून जाण्याचा आरोप पती नितीन सिन्हा यांच्यावर आहे. घर विकून परदेशात जाण्याला रेणू सिन्हा यांचा विरोध होता. त्यामुळे नितीन सिन्हा यांनी रेणू सिन्हा यांची हत्या करण्यात आल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – India Alliance : जी20च्या स्नेहभोजनाला ममता बॅनर्जी यांची उपस्थिती, काँग्रेसची नाराजी

काय होती प्लॅनिंग?

नितीन सिन्हा यांना यापूर्वी ब्रिटीश पासपोर्ट मिळाला होता. त्यामुळे ते आपले घर विकून ब्रिटनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत होते. यामुळे त्यांनी महिला वकील रेणू सिन्हा यांच्यावर घर विकण्यासाठी दबाव आणत होते. पण रेणू सिन्हा यांना घर विकायचे नव्हते. यामुळे नितीन सिन्हा यांनी रेणू सिन्हा यांची हत्या केली. यानंतर त्यांनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना तयार केली. पोलीस घरी पोहोचण्यापूर्वी बरेच पुरावेही नष्ट केले होते. मात्र रेणू सिन्हा यांच्या भावाने पोलिसांनी फोन केल्यामुळे ते घटनास्थळी पोहचले आणि नितीन सिन्हा यांचा सगळा खेळ उघड  झाला.

- Advertisment -