घरदेश-विदेश'व्हॉटसअॅपवर' दिला तलाक, महिलेने मागितली सुषमा स्वराज यांच्याकडे मदत

‘व्हॉटसअॅपवर’ दिला तलाक, महिलेने मागितली सुषमा स्वराज यांच्याकडे मदत

Subscribe

आणखी एक तिहेरी तलाकचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये एका २९ वर्षीय महिलेला तिच्या पतीने व्हॉटसअॅपवरुन तलाक दिला आहे.

तिहेरी तलाक विरोधात मुस्लिम महिलांनी आवाज उठवला. त्यानंतर या संदर्भात बदल देखील सुचविण्यात आले. पुढील सहा महिन्यात या विधेयकात बदल होणार आहेत. पण त्याआधी आणखी एक तिहेरी तलाकचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये एका २९ वर्षीय महिलेला तिच्या पतीने व्हॉटसअॅपवरुन तलाक दिला आहे. या संदर्भात महिलेने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज मदत यांची मदत मागितली आहे.

नेमकं प्रकरण काय?

हैदराबादमध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेचा ओमान येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय पुरुषाशी मे २०१७ मध्ये विवाह झाला. त्या पुरुषासोबत ती महिला वर्षभर राहिली. पण तिचा पती तिला त्रास देऊ लागला. पण तरी त्या महिलेने नवऱ्यासोबत राहणे पसंत केले. मधल्या काळात त्यांना बाळ देखील झाले. पण ते कमजोर असल्यामुळे ते जास्त काळ जगू शकले नाही. त्या मुलाच्या मृत्यूनंतर पती सतत मला सोडण्याचे सांगू लागला. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये तिच्या पतीने तिला तिच्या हैदराबादच्या घरी पाठवून दिले.

- Advertisement -
वाचा- सहा महिन्यात तिहेरी तलाक कायद्यात बदल होणार

व्हॉटसअॅपवरुन दिला तलाक

जुलैला ही महिला हैदराबादला माहेरी परतल्यानंतर तिचे औषधोपचार सुरु होते. १२ ऑगस्टला त्याने महिलेला व्हॉटसअॅपवरुन तलाक दिला. त्यानंतर तिने नवऱ्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिचा फोन उचलला नाही. यासंदर्भात या महिलेना सुषमा स्वराज यांची मदत मागितली असून न्याय मिळण्याची अपेक्षा केली आहे. शिवाय गरिब मुस्लिम महिलांवर अन्याय होत असून याकडे सुषमा स्वराज यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी देखील तिने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -