घरट्रेंडिंगबायकोला मारण्याचा पहिला प्रयत्न फसला, तर दुसऱ्यांदा केलं असं काही की....

बायकोला मारण्याचा पहिला प्रयत्न फसला, तर दुसऱ्यांदा केलं असं काही की….

Subscribe

केरळमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. दोन वर्षांपूर्वीच लग्न झालेल्या सूरजने आपल्या बायकोला मारण्यासाठी कट रचला.

केरळमध्ये एका नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. आपल्याला दुसरं लग्न करता यावं यासाठी नवऱ्याने आपल्या बायकोची हत्या केली. पण यावेळी नवऱ्याने बायकोला मारण्यासाठी वापरलेला पर्याय काहीसा वेगळाच होता. या माणसाने आपल्या बायकोला सापाचा दंश करून तीची हत्या केली आहे. दोन वर्षांपूर्वीच या दोघांच लग्न झालं होतं.

केरळमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. दोन वर्षांपूर्वीच लग्न झालेल्या सूरजने आपल्या बायकोला मारण्यासाठी कट रचला. आपल्या मित्राच्या साथीने सुरजने बायकोला मारण्याचा डाव आखला. यासाठी त्याने सापाचा दंश बायकोला केला. पण त्याचा प्रयत्न फसला. पण एकदा आपला प्रयत्न फसल्यानंतर सुरजने पुन्हा एकदा बायकोला मारण्यासाठी कट रचला.सुरजने पुन्हा एकदा सापाचा दंश आपल्या बायकोला केला. मात्र यावेळी सुरज यशस्वी झाला. सापाच्या दंशामुळे, त्याच्या विशामुळे सुरजच्या बायकोचा मृत्यू झाला. या सगळ्यामागे दुसरं लग्न हे एकमेव कारण होतं.

- Advertisement -

सुरजने बायकोची ७ मेला हत्या केली. केरळ पोलिसांनी अपराधी सुरजला रविवारी अटक केली. त्याचबरोबर सुरजच्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


हे ही वाचा – मास्क घातल्यावर ही तुम्ही आहात तसेच दिसाल, फोटोग्राफर्सने लढवली शक्कल!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -