Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पतीने महिलांचे फोटो केले लाईक, पत्नीने फोटो प्रिंट करुन दिले 'व्हॅलेंटाईन गिफ्ट'

पतीने महिलांचे फोटो केले लाईक, पत्नीने फोटो प्रिंट करुन दिले ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट’

पत्नीच्या हटके गिफ्टची सोशल मिडियावर धूम

Related Story

- Advertisement -

सोशल मिडियावर एका महिलेने आपल्या पतीला व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट दिलेली व्हिडिओ चांगलीच धुमाकूळ घालत आहे. पत्नीने आपल्या पतीला हटके आणि वेगळे गिफ्ट दिले आहे. अमेरिकेची रहिवासी आणि टिकटॉकर ग्लोरियाने आपल्या पतीला दिलेल्या गिफ्टचा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर प्रतिक्रि्याही दिल्या आहेत. ग्लोरियाला आपल्या पतीला व्हॅलेंटाईन गिफ्ट द्यायचे होते. त्यासाठी तिला काहीतरी वेगळे गिफ्ट द्यायचे होते. पतीने सोशल मिडियावर ज्या महिलांचे फोटो लाईक केले होते. ते फोटो पत्नीने डाऊनलोड केले आणि त्या फोटोंचे गिफ्ट आपल्या पतीला दिले. तसेच पतीला दिलेल्या गिफ्टचा फोटो आणि व्हिडिओही सोशल मिडियावर टाकला आहे.

पत्नी ग्लोरियाने म्हटले आहे की, तुम्ही पती/प्रियकराला व्हॅलेंटाईन डेला काय गिफ्ट दिले? ग्लोरियाने पोस्ट केलेली व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाली असून एकण १ करोड ३८ लाखपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. ग्लोरियाने पतीने लाईक केलेल्या सर्व महिलांचे फोटो घेतले. ते फोटो प्रिंट करुन त्यांना चांगल्या प्रकारे एका बॉक्सला लावले आणि आपल्या पतीला गिफ्ट म्हणून दिले आहे. गिफ्ट देताना म्हटले आहे की, प्रत्येकजण आपल्या पती, प्रियकराला गिफ्ट देत आहे. त्यामुळे मी पण एक वेगळे गिफ्ट तुम्हाला दाखवते अस म्हणत तिने व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -

ग्लोरियाने दिलेल्या गिफ्टला काही लोकांनी पसंत केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र या गिफ्टवर नाराजी दर्शवली आहे. तर एकाने पतीला गिफ्ट दिल्यावर तो कसा व्यक्त झाला हे विचारले होते. यावर पतीला गिफ्ट दिल्यावर आनंदीत असल्याचा फोटो ग्लोरियाने शेअर केला आहे. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, पती एखाद्या महिलेचा फोटो लाईक करु शकत नाही का? एक गोष्ट चांगली आहे की मी अजून अविवाहित आहे. असे बऱ्याच नेटकऱ्यांनी ग्लोरियाच्या पोस्टवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

- Advertisement -