घरदेश-विदेशमाझा नवरा ब्राह्मण नाही, महिलेची कोर्टात धाव

माझा नवरा ब्राह्मण नाही, महिलेची कोर्टात धाव

Subscribe

नवरा ब्राह्मण नाही म्हणून गुजरातमधील महिलेनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एकता मेहता असं या महिलेचं नाव आहे.

माझा नवरा ब्राह्मण नाही. त्यानं माझी फसवणूक केली आहे. अशी तक्रार २३ वर्षीय महिलेनं पोलिस ठाण्यात केली आहे. नवऱ्यानं खोटी जात सांगून माझ्याशी लग्न केलं असे या २३ वर्षीय महिलेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यामधील एकता पटेल या महिलेनं नवऱ्यानं खोटी जात सांगून लग्न केल्यांनं पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. माझं नाव यश मेहता आहे. असं सांगून माझ्याशी लग्न केलं. पण ज्यावेळी आम्ही रजिस्टेशन ऑफिसला गेलो त्यावेळी मात्र यशनं खोटी जात सांगितल्याचं माझ्या लक्षात आलं. असं या तक्रारीमध्ये एकता पटेलनं म्हटलं आहे. यशचं आडनाव मेहता नसून खामर आहे. तसंच तो ब्राह्मण नाही असं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

M.Com पूर्ण केल्यानंतर एकता मेहतानं नोकरीसाठी एका गॅस एनज्सीमध्ये अर्ज केला. तिच्या घरची परिस्थिती देखील बेताची होती. म्हणून महिना ५ हजार पगारावर एकतानं अकाऊंटंट म्हणून नोकरीला सुरूवात देखील केली. यावेळी एकताची ओळख गॅस एजन्सीच्या मालक जोत्स्ना मेहता यांचा मुलगा यशशी झाली. यावेळी यशनं आमचं कुटुंब ब्राह्मण असल्याचं सांगत आमचं आडनाव पटेल आहे अशी बतावणी केली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठीमध्ये वाढ झाली. या भेटीचं रूपांतर प्रमामध्ये केव्हा झालं याची कल्पना देखील दोघांना आली नाही. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर २३ एप्रिल रोजी दोघांनी लग्न केलं. हिंदु धर्माच्या चालीरितीनुसार एकता आणि यशनं लग्न केलं. पण, ज्यावेळी आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा यशचं आडनाव मेहता नसून खामर असल्याचं कळलं. शिवाय तो ब्राह्मण देखील नाही. हे ऐकून मला धक्का बसल्याचं एकता मेहतानं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. लग्नानंतर जेव्हा मला यशच्या आडनावाबद्दल कळलं तेव्हा मी देखील याबद्दल शोध घेतला. त्यावेळी माझ्या देखील यश ब्राह्मण नसल्याचं लक्षात आलं. यशनं माझ्याशी खोटा बोलला असून त्यानं माझा विश्वासघात केल्याचं एकतानं म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -