घरताज्या घडामोडीबायकोला वाचविण्यासाठी नवरा शार्कसोबत भिडला; बुक्कीतच शार्कला गार केला

बायकोला वाचविण्यासाठी नवरा शार्कसोबत भिडला; बुक्कीतच शार्कला गार केला

Subscribe

आपल्या बायकोला शार्क पासून वाचविण्यासाठी एका नवऱ्याने थेट शार्कसोबत पंगा घेतला. ऑस्ट्रेलियामधील साऊथ वेल्स प्रांतातील पोर्ट मॅकरीमधील समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली आहे. सिडनी मॉर्निंग पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. नवरा – बायको पाण्यात सर्फिंग करत असताना शार्कने पत्नीवर हल्ला केला. मात्र पतीने प्रसंगवधान दाखवत शार्कसोबत हातानेच मुकाबला करत पत्नीला वाचवले.

शार्क समुद्रातला सर्वात धोकादायक प्राणी. ज्याप्रमाणे गोड्या पाण्यात मगरीच्या तावडीतून सुटणे अवघड. त्याप्रमाणेच समुद्रात शार्कने एकदा हल्ला केला तर त्यातूनही वाचने कठिण. पण माईक रॅपली याने आपली पत्नी चँटेला डोलीला चक्क शार्कच्या म्हणजे मृत्यूच्या तावडीतूनच परत खेचून आणले. ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील माध्यमामध्ये या बहादुर पतीचे कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

सिडनी मॉर्निंग पोस्टने दिलेल्या बातमीनुसार दोघे पती-पत्नी शेली कोस्ट समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी सर्फिंगचा आनंद घेत होते. तेवढ्यात एका व्हाईट शार्कने चँटलीचा पाय ओढला. काही कळण्याच्या आत चँटली पाण्यात खेचली गेली. यानंतर पती माईकने क्षणाचाही विलंब न करता शार्कवरच झडप घातली. यावेळी त्याच्याकडे कोणतेही हत्यार नव्हते. केवळ मुठीने शार्कला बुक्के मारून त्याने शार्कचा प्रतिकार केला.

मार्कने मोठ्या धैर्याने शार्कचा मुकाबला करत त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर बुक्के हाणले. माइकच्या या आक्रमक पवित्र्यासमोर शार्कने माघार घेत त्याच्या पत्नीचा पाय सोडून दिला आणि तिथून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार हा शार्क २ ते ३ मीटर म्हणजेच १० फुटांपर्यंतचा होता. या घटनेनंतर सर्फ लाईव्ह सेव्हिंग न्यू साऊथ वेल्सचे मुख्य अधिकारी स्टिव्हन पियर्स यांनी माइकचे कौतुक केले. धोका ओळखून माईकने आपल्या सर्फबोर्डवरुन उडी घेत पत्नीचे प्राण वाचविले आहेत.

- Advertisement -

या अपघातानंतर पत्नीच्या पायाला दुखापत झाली आहे. तर माईक देखील किरकोळ जखमी झालेला आहे. दोघांवरही आता उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर पोर्ट मॅकरी येथील समुद्रकिनारे बंद ठेवण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -