घर क्राइम Hyderabad Beggar : बिर्याणी-दारू अन् रिक्षाने प्रवास; भिकाऱ्यांची महिन्याला कमाई तब्बल दोन...

Hyderabad Beggar : बिर्याणी-दारू अन् रिक्षाने प्रवास; भिकाऱ्यांची महिन्याला कमाई तब्बल दोन लाख रुपये

Subscribe

Hyderabad Beggar : हैदराबाद पोलिसांनी भीक मागणाऱ्या रॅकेटचा (Hyderabad Beggar) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ‘भिकारी माफियां’वर नुकत्याच केलेल्या कारवाईदरम्यान 23 भिकाऱ्यांना दलदलीतून बाहेर काढले आहे. पोलिसांनी भीक मागणाऱ्या कुटुंबाची चौकशी केली असता काही कुटुंबे महिन्याला दीड ते दोन लाख रुपये कमवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही ‘कुटुंब’ हैदराबाद, सायबराबाद आणि रचकोंडा या ट्रॅफिक जंक्शनवर पूर्ण नियंत्रण ठेवत होते आणि भीक मागत होते. (Hyderabad Beggar Biryani Alcohol and Rickshaw Travel The monthly income of beggars is about two lakh rupees)

हैदराबाद आयुक्तांलयातील टास्क फोर्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “पती, पत्नी, 4-5 मुले आणि वृद्धांसह काही कुटुंबांनी तिन्ही ट्रॅफिक जंक्शनवर ताब्यात घेतला होता. ते इतर भिकाऱ्यांना याठिकाणी भीक मागू देत नव्हते. भीक मागणाऱ्या कुटुंबाला दिवसाला सरासरी 4 ते 7 हजार रुपये मिळत होते. अधिकाऱ्याने सांगितले की, या कुटुंबाने ट्रॅफिक जंक्शन आपापसात विभागली होती. या कुटुंबामध्ये जेव्हा कधी वाद होतात तेव्हा वडीलधारी माणसं हस्तक्षेप करतात आणि वेगवेगळे टायमिंग स्लॉट किंवा ट्रॅफिक सिग्नल पॉइंट निश्चित करून वाद मिटवतात.

- Advertisement -

हेही वाचा – Home Affairs Ministry : गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी; CVCच्या अहवालातील निष्कर्ष

बिर्याणी, दारू आणि रिक्षाने घरी परतायचे भिकारी

अधिकाऱ्याने सांगितले की, भिकारी सकाळी 10 वाजता त्यांच्या कुटुंबियांसोबत रिक्षाने ट्रॅफिक जंक्शनवर येतात. दिवसभर भीक मागून झाल्यावर संध्याकाळी ते रिक्षानेच घरी जातात. यातील काही कुटुंब व्याजाने पैसे देत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. याशिवाय यातील काही कुटुंब घरी जाताना बिर्याणीचे पार्सल आणि दारू घेऊन जात होते. महिनाभरातील भिकाऱ्यांची कमाई पाहून काही बेईमान लोक संघटित माफिया म्हणून काम करू लागले. या लोकांनी एकप्रकारे दिव्यांग, लहान मुले, वृद्ध स्त्री-पुरुषांना काम देत होते. तसेच एक दिवस भीक मागितल्यानंतर त्यांना ‘माफिया कुटुंबे’ प्रत्येकी 200 रुपये देत होते.

पोलिसांकडून भिकाऱ्यांच्या म्होरक्याला अटक 

- Advertisement -

हैदराबादमधील फतेहनगर, गुलबर्गा येथील रहिवासी असलेल्या भिकाऱ्यांचा म्होरक्या अनिल पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचे साथीदार रामू, रघु, धर्मेंद्र यांच्यासह गुलबर्गा, कर्नाटकातील सर्व भिकारी कुटुंबे अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पोलीस तपासात म्होरक्या अनिल पवार आणि त्यांच्या इतर साथीरादांचे नेटवर्क हैदराबादमधील ताडबून ते हायटेक सिटीपर्यंत विविध चौकात पसरल्याचे आढळून आले. ही भिकारी कुटुंबे त्यांच्या समाजातील गरीब स्त्रिया, अल्पवयीन मुले, विधवा आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांचे शोषण करत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Crime News : अल्पवयीन प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक; वाचा सविस्तर प्रकरण…

अनिल पवार भीक मागणाऱ्या मुलांना अंमली पदार्थ द्यायचा

पोलिसांनी सांगितले की, अनिल पवार हा शहरातील विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या मुलांना अंमली पदार्थ पुरवायचा. पोलिसांनी भिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. या भिकाऱ्यांना रोजंदारी म्हणून केवळ 200 रुपये दिले जात होते. आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत पश्चिम विभागीय टास्क फोर्स टीम, हैदराबादचे मानवी तस्करी विरोधी युनिट (AHTU), जुबली हिल्स पोलीस, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ‘स्माइल प्रोजेक्ट’चे नेते यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली होती.

- Advertisment -