घरताज्या घडामोडीहैदराबादेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

हैदराबादेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

अंबरपेट येथील परिसरात मृत मुलगा प्रदीपचे वडील सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप हा वडिलांसोबत त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी या अंबरपेट या परिसरात प्रदीप एकटा फिरत होता. प्रदीप एकटा असल्याचे पाहताच तेथील भटक्या तीन ते चार कुत्र्यांनी प्रदीपला घेरले.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली. प्रदीप असे या मृत मुलाचे नाव आहे. रविवारी ही घटना घडली असून, ही घटना अंबरपेट येथील परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Hyderabad Five Years Boy Killed By Stray Dog Amberpet Dog CCTV)

अंबरपेट येथील परिसरात मृत मुलगा प्रदीपचे वडील सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप हा वडिलांसोबत त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी या अंबरपेट या परिसरात प्रदीप एकटा फिरत होता. प्रदीप एकटा असल्याचे पाहताच तेथील भटक्या तीन ते चार कुत्र्यांनी प्रदीपला घेरले. त्यानंतर प्रदीपने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रदीपचा मृत्यू झाला.

- Advertisement -

कुत्र्यांनी प्रदीपवर हल्ला केला त्यावेळी तेथे असलेल्या त्याच्या वडिलांना कुत्र्यांच्या तावडीतून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी शेअर करत त्या व्हिडीओवर दु:ख व्यक्त केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘आम्ही आमच्या नगरपालिकांमध्ये रस्त्यावरील कुत्र्यांचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही प्राणी काळजी केंद्रे, प्राणी जन्म नियंत्रण केंद्रे तयार केली आहेत. कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आहे आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ’, असे तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी सांगितले.

- Advertisement -

गुजरातच्या सुरतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर ही घटना घडली आहे. याआधी, जानेवारीमध्ये बिहारमधील अराहमध्ये एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने 80 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वारंवार येत असलेल्या बातम्यांमुळे निवासी सोसायट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांना आवारात परवानगी द्यायची की नाही यावर वादाला तोंड फुटत आहे. प्राण्यांना चारा दिल्याबद्दल अनेकांनी श्वानप्रेमींना टार्गेट केले आहे.


हेही वाचा – विधिमंडळाबाहेरून विधानसभा अध्यक्ष अपात्र करण्याचे अधिकार आहेत का?- कपिल सिब्बल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -