घरCORONA UPDATEभारतात वेगळाच विषाणू; शास्त्रज्ञांचा दावा

भारतात वेगळाच विषाणू; शास्त्रज्ञांचा दावा

Subscribe

भारतात कोरोना विषाणूचा वेगळा प्रकार असल्याचा दावा हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) येथील शास्त्रज्ञांनी केला आहे.

भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. दरम्यान, हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) येथील शास्त्रज्ञांना देशातील कोरोना-संक्रमित लोकांमध्ये कोरोना विषाणूचा वेगळा प्रकार आढळला आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की सध्या हा विषाणू मुख्यतः तामिळनाडू आणि तेलंगणा सारख्या दक्षिणेकडील राज्यात आहे.

शास्त्रज्ञांनी विषाणूच्या या अनोख्या गटाला ‘क्लेड ए३आय’ असं नाव दिलं आहे, जे भारतातील जीनोम (जीन्सचे अनुक्रम) क्रमांकाच्या ४१ टक्के नमुन्यांमध्ये आढळला आहे. शास्त्रज्ञांनी ६४ जीनोमचे अनुक्रम तयार केले आहेत. सीसीएमबीने ट्विट करत म्हटलं आहे की, “भारतात SARS-CoV2 च्या उद्रेकांच्या जीनोम विश्लेषणावर एक नवीन तथ्य समोर आलं आहे. संशोधनानुसार, विषाणूंचा एक अनोखा समूह देखील भारतात अस्तित्वात आहे. त्याचं नाव क्लेड ए३आय (CLADE-A3i) आहे.”

- Advertisement -

सीसीएमबीने पुढे म्हटलं की, “असा विश्वास आहे की हा समुह फेब्रुवारी २००२० मध्ये विषाणूमुळे उदयास आला होता आणि तो देशभर पसरला. त्यात भारतातील SARS-CoV2 जीनोमच्या सर्व नमुन्यांपैकी ४१ टक्के आणि जागतिक जीनोमच्या साडेतीन टक्के आहे.” सीसीएमबी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अंतर्गत येते. सीसीएमबीचे संचालक आणि संशोधन पेपर सह-लेखक राकेश मिश्रा म्हणाले की तेलंगणा आणि तामिळनाडू येथून घेतले जाणारे बहुतेक नमुने क्लेड ए३आय सारखे आहेत.

हा प्रकार फिलीपिन्स आणि सिंगापूरसारखा

मिश्रा म्हणाले की, दिल्लीत सापडलेल्या नमुन्यांशी काही प्रमाणात साम्य आहे, परंतु महाराष्ट्र आणि गुजरातमधील नमुन्यांशी काहीही साम्य नाही. या प्रकारचे कोरोना विषाणू सिंगापूर आणि फिलिपिन्समध्ये सापडलेल्या प्रकरणांसारखेच आहेत. ते म्हणाले की, आगामी काळात जिनोम सीक्वेन्सचे आणखी नमुने तयार केले जातील आणि यामुळे या विषयावर अधिक माहिती मिळण्यास मदत होईल.

- Advertisement -

हेही वाचा – व्यवसाय ट्रॅकवर कसा आणायचा? राहुल गांधी राजीव बजाज यांच्याशी आज चर्चा करणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -