घरताज्या घडामोडीHypersonic Missile: अमेरिकेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, यूएस सैन्याच्या क्षमतेमध्ये वाढ

Hypersonic Missile: अमेरिकेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, यूएस सैन्याच्या क्षमतेमध्ये वाढ

Subscribe

अमेरिकेचे सैन्यदल आणि वायू दलाची ताकद आणखी वाढली आहे. यूएस वायुदलाकडून सोमवारी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राचा वेग हा आवाजाच्या वेगाच्या पाचपट असल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान हे क्षेपणास्त्र भेदक मारा करणारे असून अचून लक्ष्य साधण्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

अमेरिकेच्या हवाई दलाकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अमेरिकेच्या वायू दलाने दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र B-52 बॉम्बरने एअर-लाँच करुन रॅपिड रिस्पॉन्स वेपन (ARRW) सोडले होते.

- Advertisement -

एकट्या अमेरिकेने हायपरसॉनिक या घातक क्षेपणास्त्राची चाचणी केली नाही आहे. तर यापूर्वी अनेक चीन, रशियानेसुद्धा चाचणी केली आहे. क्षेपणास्त्राची वेग आणि युक्ती त्यांना ट्रॅक करणे आणि रोखणे कठीण करते.

दरम्यान रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. तर चीनकडूनही चाचणी करण्यात आली असल्याचा दावा अमेरिकेच्या लष्कराकडून करण्यात आला होता. परंतु चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाने हा दावा ऑक्टोबरमध्येच फेटाळला होता.

- Advertisement -

तीन प्रकारचे असतात हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तीन प्रकारचे असतात. यामध्ये एयरो बैलिस्टिक, ग्लाइड व्हीकल और क्रूज मिसाइल यांचा समावेश आहे. एयरो बैलिस्टिक क्षेपणास्त्र विमानाच्या सहाय्याने डागण्यात येते. रॉकेट वापरुन मिसाईल वेग धारण करते. विना ऊर्जा लक्ष्य निश्चित होते.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर सुपर विनाशकारी शस्त्र म्हणून केला जातो. हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या पाचपट वेगाने उड्डाण करताना त्यांच्या निशाण्याकडे जाणारी क्षेपणास्त्रे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे गेल्या तीन दशकांनंतरचे सर्वात प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे.


हेही वाचा : chardham yatra 2022 : चारधाम यात्रेत आतापर्यंत 41 यात्रेकरूंचा मृत्यू; पावसाच्या विश्रांतीनंतर यात्रा पुन्हा सुरू

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -