मी अटकेची वाट पाहत आहे ; FIR नंतर कंगनाने शेअर केला बोल्ड फोटो

I am awaiting arrest; Bold photo shared by Kangana after FIR
मी अटकेची वाट पाहत आहे ; FIR नंतर कंगनाने शेअर केला बोल्ड फोटो

बॉलीवूडची पंगा गर्ल कगंना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते.मोदी सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तुलना खलिस्तानी चळवळीशी केली. त्यानंतर देशाच्या विविध भागात त्याच्यावर अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. शीख समुदायाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी कंगनावर एफआयआर नोंदवला आहे. आज २४ नोव्हेंबरला बुधवारी कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट करत माहिती दिली की, आजही तिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, यामुळे कंगनाला काही फरक पडत नाही.

कंगनाची नवी पोस्ट 

कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हातात वाईनचा ग्लास धरलेली दिसत आहे. यावर कंगनाने लिहिले की, “आणखी एक दिवस, दुसरी एफआयआर… जर ते मला अटक करायला आले तर… माझा मूड सध्या घरी असाच आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वी “१९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती’ असं वादग्रस्त विधान केले होते.यावरुन,वाद पेटत असतानाच कंगनाने स्वातंत्र्याचा मुद्दा बाजूला सारत खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्यावर नवं विधान केलं. कंगनाने केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

काय होती कंगनाची वादग्रस्त पोस्ट ?

कंगनाने खलिस्तानवादी दहशतवादाच्या मुद्द्याला हात घालत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तानवादी दहशतवादाविरोधातील भूमिकेचे कौतुक करत सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक फोटो शेअर केला होता.

…पण एका महिलेला विसरू नका, खलिस्तानी दहशतवादावर कंगनाची नवी पोस्ट

 


हे ही वाचा : कंगनाच्या सुरक्षेत कितीही वाढ केली तरी कायदेशीर कारवाई होणारच, नवाब मलिकांचे वक्तव्य