घरदेश-विदेशमी 'नोबेल' पुरस्कारासाठी पात्र नाही - इम्रान खान

मी ‘नोबेल’ पुरस्कारासाठी पात्र नाही – इम्रान खान

Subscribe

'काश्मीर खोऱ्यातील मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा', अशी प्रतिक्रिया स्वत: इम्रान खान यांनी दिली आहे.

‘भारतासोबत असलेला तणाव कमी करण्यासाठी शांततेचं पाऊल उचलणाऱ्या इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्या’, अशी पाकिस्तान सरकारकडून करण्यात आली होती. पाक सरकारने यासंबंधीचा प्रस्तावही  संसदेत सादर केला होता. मात्र, ‘मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा’, अशी प्रतिक्रिया स्वत: इम्रान खान यांनी दिली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या अजब मागणीबाबत इम्रान खान यांनी पहिल्यांदाच ट्वीटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.  सोमवारी याबाबत केलेल्या अधिकृत ट्वीटमध्ये खान यांनी म्हटलं आहे की, ‘नोबेल पुरस्कारासाठी मी योग्य नाही. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी मी अपात्र आहे. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार दिला गेला पाहिजे. काश्मीर प्रश्वार मुद्द्यावर तोडगा निघाला तरच या परिसरात  शांतता नांदेल आणि विकास होईल’.

- Advertisement -

पुलवामा हल्ला आणि त्याला भारताने दिलेले शक्तीशाली प्रत्युत्तर यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आता तणावाचे झाले आहेत. भारताचे वींग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात असताना तर जवळजवळ युद्धजन्य परिस्थीतीच निर्माण झाली होती. या सगळ्यादरम्यान सुरुवातील आक्रमक असणाऱ्या इम्रान खान यांनी मात्र नरमाईची भूमिका घेतलेली दिसली. दोन्ही देशात सामंजस्याचे आणि शांतेतेचे संबंध प्रस्थापित व्हावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यामुळे जगभरातून त्यांच्यावर टीकादेखील करण्यात आली. भारताकडूनही इम्रान यांचं शांततेत चर्चा करण्याचं निमंत्रण धुडकावलं गेलं. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाक सरकाने शांततेचा प्रस्ताव ठेवणाऱ्या इम्रानना नोबेल द्यावं, अशी मागणी करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -