घरदेश-विदेशमाफी मागायला मी सावरकर नाही, राहुल गांधींचा पुन्हा निशाणा

माफी मागायला मी सावरकर नाही, राहुल गांधींचा पुन्हा निशाणा

Subscribe

Rahul Gandhi On Savarkar | मी माफी मागायला सावरकर नाही, असं राहुल गांधी आज म्हणाले. राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली.

Rahul Gandhi On Savarkar | नवी दिल्ली – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचे मत जगजाहीर आहेत. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी रोखठोक भूमिका घेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी याबाबत मुद्दा छेडला आहे. मी माफी मागायला सावरकर नाही, असं राहुल गांधी आज म्हणाले. राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली.

राहुल गांधी यांनी माफी मागितली असती तर त्यांची शिक्षा रद्द करता आली असती. परंतु, राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही. याविषयी आज त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी, गांधी कोणाची माफी मागत नाहीत, अशी रोखठोक भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

- Advertisement -

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी म्हणाले की, “मी तुमच्याशी खूप वेळा बोललो आहे की भारतात लोकशाहीवर आक्रमण होतंय. याची रोज नवनवे उदाहरणं मिळत आहेत. मी एकच प्रश्न विचारला होता. अदानींची शेल कंपनी आहे. त्यात २० हजार कोटी रुपये कोणीतरी गुंतवले, हा अदानींचा पैसा नाही. अदानींचा इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय आहे. मग हे पैसे कोणाचे आहेत, हा प्रश्न मी विचारला होता. मी संसदेत याबाबत पुरावा सादर केला होता. अदानी नरेंद्र मोदी यांच्यातील नातेसंबंधाबाबत बोललो. यांचं नातं नवी नाही. गुजरातचे सीएम असल्यापासून मोदींचे त्यांच्याशी संबंध. त्याचे अनेक सार्वनिजक पुरावे आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा अदानींच्या शेल कंपनीत २० हजार कोटी कोणाचे? मोदींसोबत नातं काय? राहुल गांधींकडून सरबत्ती

“देशातील विमानतळ नियमांना बगल देऊन अदानींना देण्यात आले. याचा पुरावाही दिला. मी यासंदर्भात पत्र लिहिले. परंतु, काही फरक नाही पडला. मला खोट्यात पाडण्यासाठी मंत्र्यांनी माझ्याविरोधात अफवा पसरवली की मी परदेशी ताकदींकडून मदत मागितली. परंतु, संसदेचा नियम आहे. कोणत्याही सदस्यांवर आरोप लागला तर त्यांना उत्तर देण्याचा हक्क असतो. मी यासाठीही पत्र लिहिलं. पण, त्यांचं उत्तर नाही आलं. मग मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे गेलो. मला बोलू देण्याची विनंती केली. पण, मला बोलू दिलं गेलं नाही. मी बोलायला देऊ शकत नाही असं स्पीकर म्हणाले. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं. नरेंद्र मोदींचं अदानींसोबत काय नातं आहे आणि २० हजार कोटी रुपये कसले आहेत हे मी विचारत राहणार, मला याचं काहीही वाटत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढतोय. मी कोणालाही घाबरत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -