केंद्राकडून मुंबईतील गेमिंग, ॲनिमेशन, VFX केंद्राच्या जागेची पाहणी, सिने उद्योगातील प्रमुखांशी चर्चा

I & B Secretary Visits proposed site of National Centre of Excellence in Animation, VFX and Gaming, Comics in Mumbai
केंद्राकडून मुंबईतील गेमिंग, अॅनिमेशन, VFX केंद्राच्या जागेची पाहणी, सिने उद्योगातील प्रमुखांशी चर्चा

केंद्राच्या माहिती आणि प्रसारण सचिवांनी फिल्म सिटी संकुलातील व्हिसलिंग वुड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्थेला देखील भेट दिली आणि सुभाष घाई तसेच इतर मान्यवरांची भेट घेतली.मुंबईतील फायरस्कोअर इंटरॲक्टीव्ह या हायपर कॅज्युअल गेम विकास स्टुडीओ सह विविध खासगी निर्माण सुविधांना देखील भेट दिली. व्हीएफएक्स उद्योगातील तंत्रज्ञानविषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी त्यांनी स्टुडीओतील विविध अधिकारी आणि तंत्रज्ञांशी संवाद साधला. त्यानंतर चंद्रा यांनी चित्रपट निर्मात्यांचे दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी यश राज स्टुडीओ येथे चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातील प्रमुख नेत्यांशी विस्तृत प्रमाणात चर्चा केली.

भारतीय ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग उद्योग हे गेल्या दोन दशकांमध्ये उल्लेखनीय रीतीने विकसित आणि उत्क्रांत झाले आहेत. अधिकाधिक चित्रपट निर्माते आणि टीव्हीवरील कार्यक्रमांचे निर्माते जेन एक्स मधील दर्शकांसाठी व्हीएफएक्स आणि ॲनिमेशन सारख्या तंत्रज्ञानाने संचालित उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार करीत असताना, या क्षेत्रात कुशल व्यावसायिकांची मागणी सतत वाढत आहे.

गेमिंग उद्योगातील भारतीय कंपन्या देखील पाश्चिमात्य गेम स्टुडीओसाठी आऊटसोर्सिंग कंपन्या म्हणून काम करण्यापासून आता गेमची संरचना आणि विकसन करणाऱ्या कंपन्यांमध्ये परिवर्तीत झाल्या आहेत. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यापासून ते अगदी तळाच्या पातळीपासून सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि पुढच्या पिढीला भारतीय मूल्यांची माहिती देण्याचे माध्यम म्हणून विकसित करणे अशा मार्गांनी प्रयत्न केल्यास ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग, कॉमिक्स क्षेत्राला आपल्या समाजावर मोठा परिणाम साधता येईल अशी अपेक्षा आहे.

ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग, कॉमिक्स यांचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र या क्षेत्रात दर्जात्मक शिक्षणाची सोय करून आणि लहान लहान कार्यक्रमांचे आयोजन करून ही कौशल्य विषयक गरज भागवण्यावर आधारित संकल्पनेनुसार काम करत आहे. या क्षेत्रातील भारतातील तसेच जागतिक पातळीवरील कुशल व्यक्तींची गरज भागविण्यासाठी भारतात जागतिक दर्जाच्या बुद्धिवंतांचा ताफा निर्माण करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे.