घरट्रेंडिंगदिल्लीत फायरिंग केली, पिस्तुल यमुनेत टाकलं, नंतर क्लबमध्ये भरपूर नाचलो

दिल्लीत फायरिंग केली, पिस्तुल यमुनेत टाकलं, नंतर क्लबमध्ये भरपूर नाचलो

Subscribe

शाहरूखच्या फोनचा आता सीडीआर डेटा काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्याने हिंसाचारादरम्यान आणि नंतर कोणाशी बोलण केल आहे हे स्पष्ट होईल.

दिल्ली हिंसाचार प्रकरणात फायरींग करणाऱ्या शाहरूखला पोलिसांनी आज अटक केली. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केलेल्या कारवाईत शाहरूखने आपला प्रत्येक दिवसाचा हिशोब सांगितला आहे. दिल्लीत २४ फेब्रुवारीला फायरींग केल्यानंतर तो कुठे कुठे राहिला याचाही उलघडा त्याने केला. शाहरूखने क्राईम ब्रांचसमोर दिलेल्या कबुली जबाबात असे म्हंटले आहे की की दिल्लीतल्या फायरींगनंतर मी क्लबमध्ये जाऊन नाचलो होतो. त्यानंतर खूप वेळ टाईम पास केला. संपुर्ण २५ फेब्रुवारी या दिवशी तो दिल्लीतच होता. त्यादिवशी कनॉट प्लेसमध्ये एका पार्क केलेल्या गाडीत तो दिवसभर झोपून होता असाही कबुली जबाब त्याने दिला आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला तो गाडी घेऊन जालंधरला गेला.

जालंधरला जाऊन त्याने एका मित्राला भेटायला येत आहे असे सांगितले. पण मित्राने त्याला गोळीबार प्रकरणात पाहिले होते, त्यामुळे मित्राने शाहरूखला भेटण्यासाठी मनाई केली. त्यानंतर १ मार्चला शाहरूखला वाटले की त्याला पकडले जाऊ शकते. म्हणून तो १ मार्चपासून तो पंजाबच्या बसमध्ये फिरू लागला. पण क्राईम ब्रांचच्या टीमला माहिती मिळाली होती की तो शामली याठिकाणी आहे. त्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीमने शामली येथे सापळा लावला. नेमका त्या सापळ्यात ३ मार्चला सकाळीच तो सापडला, मग दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.

- Advertisement -

ज्या गाडीने तो फिरत होता ती गाडी ही त्याच्या काकाच्या मुलाची होती. गाडी मध्येच खराब झाली, त्यामुळे हरियाणाच्या एका गॅरेजमध्येच ती सोडली. दिल्ली हिंसाचारात वापरलेली पिस्तुल यमुना नदीत फेकल्याचा खुलासाही त्याने केला. त्यामुळे दिल्ली पोलिस आता या विधानाची चौकशी करत आहे. शाहरूखच्या फोनचा आता सीडीआर डेटा काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्याने हिंसाचारादरम्यान आणि नंतर कोणाशी बोलण केल आहे हे स्पष्ट होईल. शाहरुखने आपला मोबाईलसुद्धा कुठे तरी फेकून दिला. पण स्वतःजवळ काही नंबर ठेवले होते. त्यामुळेच तो वेगवेगळ्या ठिकाणी तो गेला. त्यानंतर अनेक ठिकाणी तो लोकांचे फोन घेऊनच बोलत राहिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -