घरदेश-विदेशआय हेट यू पापा! वडिलांकडून मिळणाऱ्या सावत्र वागणुकीमुळे मुलीने पत्र लिहून घेतला...

आय हेट यू पापा! वडिलांकडून मिळणाऱ्या सावत्र वागणुकीमुळे मुलीने पत्र लिहून घेतला गळफास

Subscribe

अहमदाबाद : वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित इयत्ता ११ वीच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये आय हेट यू पप्पा… असे लिहत आपल्या वडिलांना आत्महत्येसाठी दोषी धरले आहे. अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची भावनिक सुसाईड नोट समोर आली आहे.

राजकोटच्या धोराजी येथील वसतिगृहात राहणाऱ्या या विद्यार्थिनीने सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी वडिलांना जबाबदार धरले आहे. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, ‘आय हेट यू, पप्पा…. तुम्ही मला कधीच मुलगी मानले नाही, माझ्या मृत्यूचे कारण तुम्हीच आहात.’ या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

- Advertisement -

या विद्यार्थिनीचे नाव दिव्या दोडिया असे असून ती धोराजीच्या रॉयल स्कूलमध्ये शिकत होती. ती विज्ञान शाखेतून इंटरमिजिएट करत असल्यामुळे शाळेच्याच वसतिगृहात राहायची असे समजते. शुक्रवारी (१० मार्च) रात्री दिव्या वसतिगृहाच्या खोलीतून बाहेर न पडल्यामुळे तिच्या मैत्रिणीनी तिची खोली तपासली असता दिव्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच घटनास्थळी एक भावनिक सुसाईड नोटही सापडली. या सुसाईड नोटमध्ये दिव्याने तिच्या वडिलांना जबाबदार धरले आहे.

वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहून संपवले जीवन
दिव्याने आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहून जीव दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ‘पप्पा, माझ्या मृत्यूचे कारण तुम्ही आहात. तुम्ही मला कधीच आपली मुलगी मानली नाही, त्यामुळे मी तुमचा खूप तिरस्कार करते. तुम्हाला फक्त निर्णय कसे द्यायचे आणि रागवायचे कसे एवढेच माहित आहे,’ असे दिव्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

आईची मागितली माफी
दिव्याने तिच्या सुसाईड नोटमध्ये आईची माफी मागितली आहे. तिने लिहिले की, ‘आई जेव्हा कधी तुला माझी आठवण येईल तेव्हा मी कायम तुझ्यासोबत असेन. मला माफ कर कारण मी एवढ्या टेन्शनमध्ये राहू शकत नाही. मी माझ्या प्रत्येक अश्रूचा बदला घेईन.’

दिव्याची तब्येत खराब होती – वॉर्डन
दिव्याने ज्या दिवशी आत्महत्या केली त्यादिवशी तिला चक्कर आल्याची माहिती वसतीगृहाच्या वॉर्डनने पोलिसांना दिली. दिव्याला जेव्हा चक्कर आली तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉ. भावनेश पटेल यांनी तिची तब्येतीची चाचणी केली. वॉर्डनने पुढे सांगितले की, सर्व मुली रात्री साडेसात वाजता जेवल्यानंतर ग्रुप स्टडीसाठी कॉमन हॉलमध्ये जमतात. शुक्रवारी दिव्याची तब्येत ठीक नसल्यामुळे तिने खोलीतच अभ्यास करण्याचे मला सांगितले होते. अभ्यास करून मुली कॉमन रूममधून आपल्या रुममध्ये जाईपर्यंत दिव्याने स्वत:ला पंख्याला लटकवून घेतले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -