घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंचीही ईडी चौकशी होणार - किरीट सोमय्या

उद्धव ठाकरेंचीही ईडी चौकशी होणार – किरीट सोमय्या

Subscribe

किरीट सोमय्या ईडी, आयकर विभागाकडे तक्रार करणार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिल्लीत मंत्री तसेच अधिकाऱ्यांची भेट घेत आता उद्धव ठाकरे यांच्या रायगड येथील मालमत्ता खरेदी प्रकरणात आणखी एक नवा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सहा वर्षे बेनामी पद्धतीने मालमत्ता ठेवली. तसेच या मालमत्तेचा व्यवहार विधानसभा निवडणुक घोषणापत्राच्या अॅफिडीव्हेटमध्ये दाखवला नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळेच हा एक प्रकारचा बेनामी मालमत्तेचा तसेच मनी लॉड्रिंगचा व्यवहार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. लवकरच या प्रकरणात आयकर विभाग तसेच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) कडे तक्रार दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. आज मी केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांची भेट घेतली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून ईडी आणि आयकर विभागाकडे तक्रार करणे गरजेचे असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी किरीट सोमय्यांना सांगितले. हा मालमत्ता व्यवहार लपवण्याचा गुन्हा अतिशय गंभीर असून या प्रकरणात कारवाई व्हायला हवी असे रविशंकर प्रसाद यांनी सोमय्यांना सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी मालमत्तेच्या व्यवहारातील योग्य माहिती आपल्या विधानसभा निवडणुकीच्या अॅफिडीव्हेटमध्ये दाखल केली नाही. त्याबाबतची सुनावणी येत्या आठवण्यात केंद्रीय निवडणुक आयोगासमोर होणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी जमीनीचे व्यवहार, बंगले लपवले याबाबतची तक्रार मी निवडणुक आयोगाकडे केली होती. पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणुक आयोगासमोर सुनावणी असणार आहे. सहा वर्षे संपत्ती बेनामी राहिल्याने ईडीदेखील कारवाई करू शकते असे ते म्हणाले. वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत ही मालमत्ता अन्वय नाईक यांच्याच नावे होती. पण या संपत्तीचे मालक हे उद्धव ठाकरे होते. अॅफिडीव्हेटमध्ये माहिती लपवून उद्धव ठाकरे यांनी मतदारांना अंधारात ठेवल्याचा आरोप सोमय्यांनी केला. म्हणूनच या प्रकरणात आयकर आणि ईडी विभागाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात राज्यपालांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पवार, ठाकरेंचा त्या महिलेवर दबाव

धनंजय मुंडे यांनी दुसर लग्न करणे, तिसऱ्या महिलेशी संबंध ठेवणे, हिंदु विवाह कायद्यानुसार तसेच आयपीसीनुसार हा गुन्हा आहे. सनदी अधिकारी निलंबित होतात. तर हेदेखील एका अर्थाने सरकारी सेवा देणाऱ्या व्यक्ती आहेत. निवडणुक आयोगाने यामध्ये निलंबनाची कारवाई तर केली पाहिजे. पण त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील कारवाई करणे गरजेचे आहे असे किरीट सोमय्या म्हणाले. दबावामुळे पवार, ठाकरेंपुढे राज्यात कुणीही बोलत नाही ही स्थिती आहे. माझ्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. गोळ्या झाडण्यापासून शेवटची वॉर्निंगही मला संजय राऊतांमार्फत देण्यात आली. रेणू शर्मा ही एकटी महिला कस काय पुढे लढू शकते ? असाही सवाल त्यांनी केला. धनंजय मुंडे हे दुसऱ्या पत्नीचा उल्लेख सार्वजनिक आयुष्यात करत आहेत. मात्र दुसऱ्या पत्नीचा उल्लेख हा निवडणुकीच्या अॅफिडीव्हेटमध्ये नाही. अशा गुन्ह्याला शरद पवार काय सर्टीफिकेट देणार असेही सोमय्या म्हणाले. हे गुन्हे बाहेर आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांचा पाठपुरावा करणारच असेही त्यांनी सांगितले.

 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -