घरदेश-विदेशसत्तास्थापनेवर मी प्रतिक्रिया देणार नाही - देवेंद्र फडणवीस

सत्तास्थापनेवर मी प्रतिक्रिया देणार नाही – देवेंद्र फडणवीस

Subscribe

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत मी प्रतिक्रिया देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘सत्तास्थापनेबाबत कुणीही कितीही टीका केली किंवा कुणीही सत्ता स्थापनेचा दावा केला तरी याबाबत मी किंवा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून दहा हजार कोटी मिळावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक संपन्न झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.


हेही वाचा – ‘तरुण भारत’मधून शिवसेनेवर टीका; राऊत यांचे खिल्ली उडवत प्रत्युत्तर

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी युतीचा उल्लेख टाळला

अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा उल्लेख टाळला आहे. ‘महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल. त्यासाठी आम्ही आश्वास्त आहोत’, असे फडणवीस म्हणाले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी युतीचे सरकार येईल, असे म्हटलेले नाही. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ‘सरकार स्थापनेबाबत कुणीही काहीही दावा केला किंवा काहीही म्हटले तरी मी किंवा भाजपकडून त्यावर प्रतिक्रिया दिली जाणार नाही’, असे ते स्पष्टपणे म्हणाले.


हेही वाचा – राज्यात पुन्हा निवडणुका होणार?; जयकुमार रावल यांचे संकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -