Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशIAF Fighter Jet Crash : हरियाणामध्ये हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात, समोर आली हे माहिती

IAF Fighter Jet Crash : हरियाणामध्ये हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात, समोर आली हे माहिती

Subscribe

नवी दिल्ली : हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पंचकुलातील मोरनी जवळ असलेल्या बालदवाला गावात लढाऊ विमान कोसळले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, अंबाला येथील हवाई अड्ड्यावरून प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर विमानात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सदर लढाऊ विमानाचा अपघात झाला. (IAF Fighter Jet Crash during training in haryana)

हेही वाचा :  Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारने एवढे कोटी दिले, आर्थिक पाहणी अहवालात केला उल्लेख

भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, वैमानिक या अपघातात बचावला आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर वैमानिकाने हे लढाऊ विमान लोकसंख्या नसलेल्या निर्जन स्थळी क्रॅश करण्यात आले. यासंदभार्तील काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले, ज्यामध्ये या अपघाताची तीव्रता किती होती? याची प्रचीती येते. लढाऊ विमानाचा अपघात हा थरकाप उडवणारा होता. विमानाचे तुकडे दूरपर्यंत विखुरले गेल्याचे दिसून आले. हवाई दलांच्या अधिकृत ट्विटरवर माहिती देण्यात आली की, “तांत्रिक बिघाडामुळे भारतीय हवाई दलाचं एक जॅग्वार विमान कोसळलं. अपघाताची नेमकी कारणं शोधण्यासाठी हवाई दलाकडून तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत,”

दरम्यान, शुक्रवारी (7 मार्च) संध्याकाळी नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर सदर अपघात घडला. जॅग्वार लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक कारणांमुळे दुर्घटनाग्रस्त झाले. वैमानिक सुरक्षितरित्या विमानाच्या बाहेर पडला. त्याआधी त्याने विमान अधिक लोकसंख्या असलेल्या परिसरापासून दूर ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. अखेरच्या काही क्षणांमध्ये वैमानिकाने दाखवलेली समयसूचकता महत्त्वाची ठरली.विमान कोसळल्यानंतर लष्कराचे बचाव पथक आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने चौकशी समिती नेमली आहे.