घरदेश-विदेशAIR Force Global Ranking : भारतीय वायुसेनेने चीनच्या PLA वायुसेनेला टाकले मागे,...

AIR Force Global Ranking : भारतीय वायुसेनेने चीनच्या PLA वायुसेनेला टाकले मागे, जाणून घ्या WDMMA ग्लोबल रेटिंगचे स्केल काय सांगते?

Subscribe

एलएसीवर (LAC) सुरु असलेल्या सीमा वादात भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय वायुसेनेने वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एयरक्राफ्ट (WDMMA) ग्लोबल रेटिंगमध्ये चीनच्या पीएलए- एअर फोर्सला (PLA Air Force) मागे टाकले आहे. वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टनुसार, (WDMMA) हे रँकिंग केवळ वायु दलाकडे असलेल्या विमानांच्या संख्येवर आधारित नाही तर आधुनिकीकरण, लॉजिस्टिक सपोर्ट, संरक्षण आणि हल्ल्याची क्षमता यावरही आधारित आहे.

WDMMA च्या ‘ट्रू-व्हॅल्यू रेटिंग’ (TVOR) मध्ये अमेरिकन वायुसेना प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेचे नौदल दुसऱ्या क्रमांकावर असून रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या आणि पाचव्या बाजूला अमेरिकेचे आर्मी एव्हिएशन आणि मरीन फोर्सेस आहेत. भारताची क्रमवारी सहाव्या तर चीन सातव्या क्रमांकावर आहे. LJ भारताचा दुसरा शेजारी देश (शत्रू) पाकिस्तान 18 व्या क्रमांकावर आहे. WDMMA च्या रेटिंगनुसार, भारताकडे एकूण 1645 लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि मालवाहू विमानं आहेत. त्याचवेळी, चीनच्या युद्ध ताफ्यात एकूण 2040 विमाने आहेत. असे असूनही भारताचं मानांकन चीनच्या अव्वल आहे.

- Advertisement -

WDMM नुसार, रँकिंग दरम्यान कोणत्या वायुसेनेमध्ये स्पेशल मिशन करण्याची क्षमता आहे, कोणाकडे किती बॉम्बर्स (विमान) आहेत आणि क्लोज कॉम्बॅट सपोर्ट (CAS) आहे याचीही काळजी घेण्यात आली होती. दरम्यान यात हवाई दलाचे प्रशिक्षण कसे आहे, स्वदेशी विमान वाहतूक उद्योग कसा आहे, याच्यावरही नंबरींग करण्यात आले.

गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध बालाकोट हवाई हल्ला असो किंवा विंग कमांडर अभिनंदन यांची डॉग-फाईट असो, जगभरात भारतीय हवाई दलाची विश्वासार्हता वाढली आहे. खुद्द चीननेही भारतीय हवाई दलाची ताकद मान्य केली आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय हवाई दलाने वायुशक्ती आणि गगनशक्ती सराव केला तेव्हा चिनी माध्यमांनी भारतीय हवाई दलाची तुलना अमेरिकेच्या हवाई दलाशी केली होती.

- Advertisement -

भारतीय हवाई दलातील स्वदेशी लढाऊ विमाने सन 2020 मध्ये पूर्व लडाखला लागून असलेल्या LAC वर चीनशी सीमावाद सुरू झाला, तेव्हा हवाई दलाने ज्या वेगाने रणगाडे, BMP वाहने आणि इतर लष्करी उपकरणे सैनिकांसह हलवली ते पाहून चिनी सैन्यही थक्क झाले. याशिवाय, अलिकडच्या वर्षांत स्वदेशी विमान वाहतूक उद्योगाला चालना देण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. यामुळेच भारतीय हवाई दल अधिकाधिक स्वदेशी लढाऊ विमाने एलसीए तेजसची स्क्वाड्रन वाढवत आहे. याशिवाय स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) देखील हवाई दलात नुकतेच सामील करण्यात आले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -