घरदेश-विदेश2025 पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यातून मिग -21 होणार निवृत्त; दुर्घटनांनंतर सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

2025 पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यातून मिग -21 होणार निवृत्त; दुर्घटनांनंतर सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

Subscribe

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातून आता मिग 21 हे लढाऊ विमान सेवानिवृत्त होणार आहे. यासह चार लढाऊ स्कॉड्रनही  येत्या तीन वर्षात सेवाबाह्य होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी हवाई दलाच्या मिग 21 विमानाचा राजस्थानमध्ये अपघात झाला. या दुर्घटनेत दोन पायलट शहीद झाले. यामुळे मिग 21 विमानांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत. या पार्श्वभूमीवर आता 2025 पर्यंत भारतीय हवाई दलाने मिग 21 विमान सेवेतून बाहेर काढण्याता निर्णय घेतला आहे.

भारतीय हवाई दलात मिग 21 विमानं गेल्या अनेक वर्षांपासून मोठा भाग आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत मिग 21 विमानाच्या अपघाताच्या घटना समोर आल्यात. ज्यामुळे विमानाच्या सुरक्षेबाबत अनेक घटना समोर आल्या.

- Advertisement -

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 1960 पासून रशियन बनावटीच्या मिग 21 विमानांचा समावेश करण्यात आला. मात्र या विमानांच्या अपघाताच्या अनेक घटना सातत्याने समोर आल्या. 62 वर्षांच्या इतिहासात मिग 21 विमान अपघाताच्या 600 घटना आत्तापर्यंत घडल्या. याशिवाय गेल्या 5 वर्षांत भारतात विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात 42 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता हवाई दलाने मिग 21 विमानांवर बंदी घातली आहे. सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मिग 21 विमानं आहेत. ही विमानं आता 2025 पर्यंत निवृत्त होणार आहे.

राजस्थानमधील बाडमेरमध्ये मिग 21 विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन पायलटचा मृत्यू झाला. मिग 21 विमान दुर्घटनेत विंग कमांडर एम.राणा आणि फ्लाइट ल्युटेनंट अद्वितीय बाल अशी मृत पायलटची नावं आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, मिग विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटर दूरवर पसरला होता. ही दुर्घटना भीमडा गावात घडली. मात्र या घटनेचा वरील निर्णयासोबत कोणताही संबंध नाही.

- Advertisement -

हेही वाचा : मराठी माणसाच्या कष्टामुळे मुंबई उभी, याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -