घरताज्या घडामोडीAfghanistan: काबुलहून C-17 विमान भारतीय राजदूतासह १२० लोकांना घेऊन गुजरातमध्ये दाखल

Afghanistan: काबुलहून C-17 विमान भारतीय राजदूतासह १२० लोकांना घेऊन गुजरातमध्ये दाखल

Subscribe

तालिबानने (taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर परिस्थिती खूप भयावह झाली आहे. त्यामुळे अनेक देश अफगाणिस्तानमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करत आहेत. भारताने देखील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू केली असून सध्या या मोहीमेच वेग वाढवण्यात आला आहे. आज काबुलहून भारतीय हवाई दलातील C-17 विमानाने (Indian Air Force C-17 aircraft) एका भारतीय राजदूतासह १२० भारतीय अधिकाऱ्यांसह उड्डाण केले होते. ते विमान आता गुजरातमधील जामनगरला पोहोचले आहे, याबाबतची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनी दिली आहे.

आज सकाळी काबुलमधून भारतीय हवाई दलाचे C-17 विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर आता १२० भारतीय अधिकाऱ्यांना सुखरुप घेऊन विमान गुजरातमधील जामनगरमध्ये पोहोचले आहे. काल, सोमवारी रात्री कर्मचाऱ्यांना विमानतळाच्या सुरक्षित भागात आणण्यात आले होते. दरम्यान सौदी अरबियाने काबुलमधून आपल्या दूतावासांपासून सर्व मुत्सद्दींना बाहेर काढले आहे. न्यूझीलँड सरकारसुद्धा देशातून आपल्या लोकांना विमान पाठवत आहेत.

- Advertisement -

काल अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दोन एअर इंडियाची विमान स्टँडबायवर ठेवली होती. तसेच काल साडे बारा वाजता एअर इंडियाचे विमान काबूलसाठी उड्डाण करणार होते. मात्र काबुलमधील हमीद करझई विमानतळावरील सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आली आणि त्यामुळे काबुलसाठी रवाना होणार सर्व विमाने रद्द करण्यात आली होती. मात्र काल C-17 विमान जवळपास १५० लोकांना घेऊन भारतात पोहोचले होते.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागाच म्हणाले की, ‘सध्या परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे की, काबुलमधील आपले राजदूत आणि त्यांचा भारतीय कर्मचाऱ्यांना तात्काळ भारतात आणले जाईल.’

- Advertisement -

हेही वाचा – Video: काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी एन्जॉय करताना दिसले पार्कमध्ये


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -