घरदेश-विदेशगुजरातमध्ये वायूदलाच्या विमानाला अपघात, पायलटचा मृत्यू

गुजरातमध्ये वायूदलाच्या विमानाला अपघात, पायलटचा मृत्यू

Subscribe

गुजरातमधील कच्छ येथे मंगळवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. कच्छमध्ये भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाला. जामनगर येथून या विमानाने उड्डाण केले होते. या दुर्घटनेमध्ये पायलट संजय चौहान मृत पावले. संजय चौहान वायूदलात एअर कमांडर पदावर कार्यरत होते. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

विमान दुर्घटनेत ५ गायींचा मृत्यू

जॅग्वार विमान नेहमीप्रमाणे प्रशिक्षण दौऱ्यावर निघाले होते. या विमानाने जामनगर येथून उड्डाण केले. बरेजा गावाच्या बाहेरील हद्दीच सकाळी साडेदहा वाजता या विमानाला अपघात झाला. अपघात होताच हे विमान शेतातील गायींना जाऊन धडकले. या दुर्घटनेत पाच गायींचा मृत्यू झाला. तर विमानात असणारे पायलट संजय चौहान शहीद झाले. या दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले.

जॅग्वार लढाऊ विमानाची खासियत

जॅग्वार विमान एक ब्रिटिश-फ्रेंच फायटर विमान आहे. ज्याला ८० च्या दशकात भारतीय वायूदलामध्ये समाविष्ट करण्यात आले. सध्या भारतीय वायूदलामध्ये जॅग्वारच्या सहा स्क्वाड्रन आहेत. जॅग्वार एक विशेष प्रकारचे लढाऊ विमान असून हे शत्रूंच्या हद्दीमध्ये घुसुन त्यांच्यावर हल्ला करु शकते. जॅग्वार विमानाच्या मदतीने सहजपणे शत्रूंच्या कँपवर, विमान तळावर आणि युध्दनौकांना लक्ष्य केले जाऊ शकते.

- Advertisement -

आसाममध्ये झाली होती अशीच दुर्घटना

याआधी आसाममध्ये माजुली द्वीप येथे वायूदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या दुर्घटनेत दोन पायलटांचा मृत्यू झाला होता. विंग कमांडर जे जेम्स और विंग कमांडर डी वत्स यांचा या अपघातात मृत्यू झाला. दोन्ही पायलटांनी इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर हे हेलिकॉप्टर क्रँश होऊन आग लागली.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -