दिल्ली हिंसाचार: धार्मिक वार्तांकन केल्यामुळे दोन वृत्तवाहिन्यांवर बंदी

दिल्ली हिंसाचार दरम्यान असंवेदनशील धार्मिक वार्तांकन केल्यामुळे केरळ मधील दोन वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

ib ministry stay on telecast of two kerala channels for reporting of delhi violence
दिल्ली हिंसाचार.

शुक्रवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दोन वृत्तवाहिन्यांवर ४८ तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली हिंसाचार प्रकरणावरून दिल्ली पोलिस आणि आरएसएसवर टीका केल्यामुळे तसंच असंवेदनशील धार्मिक वार्तांकन केल्यामुळे केरळच्या दोन वृत्तवाहिन्यांवर शुक्रवारी सायंकाळी बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. मीडिया वन आणि एशियानेट न्यूज या दोन वृत्तावहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही ही वृत्तवाहिन्या मल्याळम भाषेतील आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या दोन्ही वृत्तावहिन्यांवर सहा मार्च सायंकाळी साडे सात वाजल्यापासून ते आठ मार्च सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत बंदी घातली आहे. दोन्ही वाहिन्यांच्या प्रक्षेपण आणि प्रसारणावर बंदी घातली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणात वार्तांकन नियमांच्या विरोधात केले. जेव्हा परिस्थिती अतिशय संवेदनशील असते तेव्हा अशा प्रकारच्या वार्तांकनामुळे देशभरात जातीय द्वेष वाढू शकतो. त्यामुळे या दोन्ही वृत्तवाहिन्यांना बंदीचे आदेश दिले आहेत.

दिल्लीत हिंसाचारात ४६ जण ठार तर २०० जण जखमी झाले आहेत. भाजपच्या काही नेत्यांच्या द्वेषमूलक भाषणांमुळे दंगल भडकली. त्यामुळे यांच्यावर गुन्हा करून अटक करावी अशी याचिक उच्च न्यायालयात केली आहे. याप्रकरणी १२ मार्चला सुमावणी करणार असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्या. हरी शंकर यांनी जाहीर केलं आहे.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार: नाल्यात सापडले मृतदेह; मृतांचा आकडा ४६ वर