आयबीपीएस क्लार्क प्रिलिम्सचे निकाल लवकरात लवकर ibps.inवर होणार जाहीर; काय आहे कट ऑफ

ibps clerk prelims 2021 ibps clerk prelims result to be declared soon candidates will be able check at result on ibps
आयबीपीएस क्लार्क प्रिलिम्सचे निकाल लवकरात लवकर ibps.inवर होणार जाहीर; काय आहे कट ऑफ

१२, १८ आणि १९ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या आयबीपीएस क्लार्क प्रिलिम्स (IBPS Clerk Prelims 2021) परीक्षेचे निकाल लवकरच घोषित केले जाणार आहे. परीक्षेचे आयोजन करणारे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (Institute of Banking Personnel,IBPS) लवकरच क्लार्क प्रिलिम्स परीक्षेच निकाल घोषित करणार आहे. तसेच काही माध्यमांच्या वृत्तांनुसार हा निकाल या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांना संस्थेच्या अधिकृत पोर्टल ibps.inवर व्हिजिट करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे निकालाची निश्चित तारीख समजू शकेल. महत्त्वाचे म्हणजे परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यानंतर तो चेक करून त्याची प्रिंआऊट घेणे गरजेचे आहे.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयबीपीएस क्लार्क प्रिलिम्स परीक्षेत पास झाल्यानंतर उमेदवारांना पुढील फेरीत म्हणजे मुख्य परीक्षेत सामील व्हावे लागेल. ही परीक्षा या महिन्यात किंवा पुढील फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाईल. परीक्षेच्या तारखेची माहिती संस्थेकडून घोषित करण्यात येईल.

संभाव्य कट ऑफ हे आहेत….

माध्यमांच्या माहितीनुसार, आयबीपीएस क्लार्क प्रिमिल्स परीक्षेच्या सामान्य श्रेणीसाठी कटऑफ वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा असतो.

  • आंध्र प्रदेश ७५-८०
  • दिल्ली ७४-७८
  • बिहार ७०-७५
  • गुजरात ६९-७४
  • हिमाचल प्रदेश ६९-७५
  • केरळ ७५-८०
  • मध्य प्रदेश ७५-७९
  • महाराष्ट्र ६५-७३
  • ओडिशा ७१-७६
  • पंजाब ७२-७८

हेही वाचा – Amazon Appवर १० हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी; काय आहे प्रक्रिया?