Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश IBPS Clerk Recruitment 2021: हजारो लिपिक पदांसाठी भरती, असा करा अर्ज

IBPS Clerk Recruitment 2021: हजारो लिपिक पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Related Story

- Advertisement -

कोरोना दरम्यान, कित्येकाचा रोजगार गेला. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, पदवीधर युवकांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. आयपीएसच्या अधिसूचनेनुसार, आयबीपीएस लिपीक या पदासाठी हजारो जागा भरण्यात येणार आहे. लिपीक या पदासाठी भरती अर्ज मागविण्यात आले आहे. पदवी पूर्ण केलेली तरुण या लिपीक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच या अधिसूचनेनुसार १२ जुलै २०२१ पासून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र असणारे उमेदवार १ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या लिपीक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पूर्व व मुख्य परीक्षेची परीक्षा देणं बंधनकराक असणार आहे.

१२ जुलै २०२१ पासून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या पदाकरता अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२१ पर्यंत असणार आहे. या पदाकरता अर्ज करण्यासाठी अणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२१ आहे. या अर्ज भरल्यानंतर या पदासाठी ऑनलाईन पुर्व परीक्षा २८-२९ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे एडमिट कार्ड ऑगस्टमध्ये मिळणार असून मुख्य परीक्षा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

आवश्यक पात्रता

- Advertisement -

लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील पदवीधर पदवी घेणं आवश्यक आहे. १ जुलै २०२० रोजी उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसले पाहिजे तर त्या उमेदवारांचे किमान वय २० वर्षे असणं बंधनकारक आहे.

अर्जाचे शुल्क

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज फी ८५० रुपये अशी भरावी लागणार आहे, यासह अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये असणार आहे. लिपीक पदासाठी अर्ज करण्यासाठी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.ibps.in जाऊन अर्ज भरता येणार आहे.अर्ज करण्यासाठी वरील लिंकवर जाऊन भेट द्या.

- Advertisement -