घरदेश-विदेशIBPS PO Admit Card 2021: IBPS PO भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे'...

IBPS PO Admit Card 2021: IBPS PO भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, ‘असे’ करा डाऊनलोड

Subscribe

IBPS PO Admit Card 2021: इंस्टिट्यूड ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनमार्फत ( Institute of Banking Personnel Selection) प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या भरती परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले प्रवेशपत्र (IBPS PO प्रवेशपत्र 2021) डाउनलोड करू शकतात. या परीक्षेद्वारे एकूण ४१३५ रिक्त पदे भरली जाणार आहे.

IBPS (Institute of Banking Personnel Selection, IBPS) ने जारी केलेल्या सूचनेनुसार, प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी ११ या पदासाठी भरती केली जाईल. यासाठी २० ऑक्टोबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये (IBPS PO Recruitment 2021) उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला होता. शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख देखील हीच होती. याची पूर्वपरीक्षा (IBPS PO Exam 2021) ४ ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली जाईल. हीच मुख्य परीक्षा जानेवारी २०२२ मध्ये घेतली जाऊ शकते.

- Advertisement -

‘असे’ करा प्रवेशपत्र डाऊनलोड

१) प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम ibps.in ला वेबसाईटवर जा.

२) वेबसाइटच्या होम पेजवरील CRP PO/MT वर क्लिक करा.

- Advertisement -

३) आता Common Recruitment Process (CRP) for Recruitment of Probationary Officers/ Management Trainees in Participating Banks या लिंकवर जा.

४) यातील CALL LETTER FOR THE ONLINE PRELIMINARY EXAMINATION लिंकवर क्लिक करा.

५) आता उमेदवाराने अॅप्लीकेशन नंबर आणि पासवर्ड टाकावा.

६) सबमिटवर केल्यानंतर, प्रवेशपत्र स्क्रीनवर ओपन होईल.

७) आता प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

थेट लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

‘अशा’ भरल्या जाणार रिक्त जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने जारी केलेल्या सूचनेनुसार एकूण ४१३५ रिक्त पदांची भरती केली जाईल. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी १६०० जागा ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय ओबीसी उमेदवारांसाठी ११०२ जागा, एससी प्रवर्गासाठी ६७९ जागा, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० जागा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रवर्गासाठी ४०४ जागा आहेत.

परीक्षेच्या तारखा

IBPS ने जारी केलेल्या नोटीसनुसार, प्रिलिम्स परीक्षा ४ ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली जाईल. याची मुख्य परीक्षा जानेवारी २०२२ मध्ये घेतली जाऊ शकते. यामध्ये अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली अधिसूचना नीट वाचून घ्या.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -