IBPS Recruitment 2021: सरकारी बँकांमध्ये तब्बल ५८५८ रिक्त जागांवर नोकरीची संधी, लगेच करा अप्लाय

IBPS Recruitment 2021 application for 5858 vacancies in bank online registration from tomorrow
IBPS Recruitment 2021: सरकारी बँकांमध्ये तब्बल ५८५८ रिक्त जागांवर नोकरीची संधी, लगेच करा अप्लाय

सरकारी बँकांमध्ये लिपिक पदावर नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कारण इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने (IBPS) देशभरातील राष्ट्रीय बँकांमध्ये एकूण ५८५८ रिक्त लिपिक पदासाठीची भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केी आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक मध्ये एकूण ५८५८ पदे भरली जाणार आहे.

यापूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने ११ जुलै २०२१ रोजी या रिक्त पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली होती. ज्यासाठी उमेदवार १ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज सादर करु शकत होते. मात्र आयबीपीएसने या पदांसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उमेदवार आता २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात.

आयबीपीएसने अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यासंदर्भात जारी केलेल्या नोटीफिकेशननुसार, उमेदवार ७ ऑक्टोबरपासून या पदांसाठी अर्ज करु शकतात. ही अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत आहे. याशिवाय ८५० रु. हे परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत आहे. यामुळे उच्छुक उमेदवार ibpsonline.ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० वर्षावरील असावे परंतु २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.