घरदेश-विदेशIBPS RRB Clerk : IBPS RRB क्लर्क परीक्षेचे स्कोर कार्ड जाहीर, असा...

IBPS RRB Clerk : IBPS RRB क्लर्क परीक्षेचे स्कोर कार्ड जाहीर, असा पहा ऑनलाईन स्कोर

Subscribe

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ( Institute of Banking Personnel Selection) ने ८ आणि १४ ऑगस्टला क्लर्क या पदासाठी परीक्षा घेतली होती. या प्रिलिम्स परीक्षेचा निकाल ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता मेन्स परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपले गुण पाहण्यासाठी आज निकाल (Score Card) (IBPS RRB Clerk Exam 2021) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी आपला निकाल IBPS च्या अधिकृत वेबसाईटवर (IBPS RRB Clerk Exam 2021 Score Card) पाहू शकणार आहेत.

तसेच जे उमेदवार IBPS RRB Clerk prelims exam मध्ये उत्तीर्ण झालेत ते नोंदमी क्रमांक (Application Number) किंवा रोल नंबर (Roll Number) आणि पासवर्ड (Password) किंवा जन्मतारीख (DOB) असा डेटा फिल करुन (IBPS RRB Clerk Score Card)रिझर्ल्ट डाउनलोड करू शकतात. तसेच उमेदवार IBPS RRB Clerk 2021 च्या निकाल पत्रिकेचा कार्डमध्ये कट ऑफ (Cut-Off) तपासू शकतात. यामध्ये विभागीय आणि एकूण कट ऑफ दोन्ही देण्यात आलेले आहेत. त्यानुसार विद्यार्थी आपला स्कोर चेक करू शकतात.

- Advertisement -

IBPS RRB Clerk prelims exam Score Card पाहण्याच्या सोप्प्या स्टेप

१) सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.

२) यानंतर IBPS RRB Office Assistant prelims score card या होमपेजवरच्या लिंकवर क्लिक करा.

- Advertisement -

३) नंतर नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा रोल नंबर (Roll Number) आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड अशी माहिती भरुन SUBMIT वर क्लिक करा.

४) यानंतर तुमचं Score Card स्क्रीनवर दिसेल. ते तुम्ही डाउनलोड करून ठेऊ शकता.

Mains परीक्षेची तारीख?

IBPS RRB Clerk 2021 Mains परीक्षा १७ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. IBPS लवकरच अधिकृत वेबसाइटवर या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करणार आहे.


अफगाणिस्तानवर तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित होताच पाकिस्तानने सुरक्षा दलात केले मोठे फेरबदल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -