Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश IBPS RRB PO/Clerk Recruitment 2021: तब्बल १०४६६ रिक्त पदांसाठी IBPS जारी केले...

IBPS RRB PO/Clerk Recruitment 2021: तब्बल १०४६६ रिक्त पदांसाठी IBPS जारी केले नोटिफेकेशन, जाणून घ्या डिटेल्स

ऑनलाईन अर्ज कसा करावा ...

Related Story

- Advertisement -

IBPS PO/ Clerk Recruitment 2021 Exam Notification: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) भरतीची वाट पाहणाऱ्या उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण IBSC ने तब्बल १०४६६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात नोटीस जाहीर केली आहे. IBPS या भरतीअंतर्गत क्षेत्रीय ग्रामीण बँक (RRB) ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज (Clerk), ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिसर स्केल II आणि , III रिक्त पदे भरली जाणार आहेत. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in. वर जारी जाऊन उच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे.

IBPS RRB X 2021: महत्त्वपूर्ण तारखा

या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया ८ जून २०२१ पासून सुरु झाली आहे. त्यामुळे उमेदवार २८ जून २०२१ पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज जमा करु शकतो. तसेच २८ जूनपर्यंतच अर्जची फी जमा करावी लागणार आहे. या ऑनलाईन परीक्षांसाठी कॉल लेटर जुलै किंवा ऑगस्ट डाऊनलोड होईल. तसेच या पूर्व परीक्षांची सुरुवात ऑगस्ट २०२१ पासून होणार असून सप्टेंबर २०२१ रोजी निकाल जाहीर होतील. पूर्व परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल. आयबीपीएस आरआरबी पीओ मेन्स परीक्षा सप्टेंबर २०२१ रोजीच होण्याची शक्यता आहे. आयबीपीएस आरआरबी क्लर्क मेन्स ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित केली जाऊ शकते.

एकूण रिक्त पदे

- Advertisement -

१) ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) -५०९६ रिक्त पदे
२) ऑफिसर स्केल 1 (असिस्टेंट मॅनेजर) – ४११९ रिक्त पदे
३) ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर)- ११०० रिक्त पदे
४) ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) – १५१ रिक्त पदे

वयोमर्यादा

ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) ,ऑफिसर स्केल 1 (असिस्टेंट मॅनेजर) ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असणे गरजेचे आहे. तर
ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ४० दरम्यान पाहिजे. १ जून २०२१ या वर्षाच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल.

वेतन

- Advertisement -

ऑफिस असिस्टेंट पदासाठी ७००० ते १९३०० वेतन निश्चित केले आहे, तर,ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 पदांसाठीचे सरासरी वेतन १४००० ते २८००० रुपयांपर्यंत आहे. तसेच ऑफिसर स्केल ३ पदासाठी २५००० ते ३१५०० वेतन निश्चित केले आहे.

अर्जाची फी

१) सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी – ८५० रुपये
२) एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी – १७५ रुपये

ऑनलाईन अर्ज कसा करावा …

सर्वप्रथम IBPS ची अधिकृत वेबसाइट ibps.in वर जात होमपेजवरील CRP RRBs सेक्शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा. परंतु अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली माहिती पूर्णपणे वाचू घ्या.

निवड प्रक्रिया

IBPS RRB पीओ किंवा क्लर्क भरती परीक्षा तीन टप्प्यांत आयोजित केली जाते. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा (IBPS Prelims exam), दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा (IBPS Mains exam) होते. मेन्स परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुलाखतीसाठी (Interview) आणि प्रमाणपत्र पडताळणीसाठी (DV) यादी तयार केली जाते. मुलाखत आणि प्रमाणपत्र पडताळणीच्या आधारे संस्था अधिकृत वेबसाइटवर एक प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट तयार करते.

अधिकृत वेबसाईट 

https://ibps.in/


Covid-19 : आता एसीमुळे पसरणारे कोरोना विषाणु होणार निष्क्रिय, CSIR शोधले नवे तंत्र


 

- Advertisement -