ICAI CA Exams 2021: ५ जुलैपासून सीएच्या इंटर्मिडीएट आणि फायनल परीक्षा होणार सुरु

या परीक्षा २१ आणि २२ मे रोजी घेण्यात येणार होत्या.

ICAI CA Exams 2021: CA Intermediate and Final Exams will start from 5th July
ICAI CA Exams 2021: ५ जुलैपासून सीएच्या इंटर्मिडीएट आणि फायनल परीक्षा होणार सुरु

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने ( ICAI)  सीए  फायनल (CA Final), इंटर्मिडीएट (Intermediate) आणि पीक्यूसी (PQC) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या ५ जुलै पासून या परीक्षा सुरु होणार आहेत. आयसीएआय सीए फायनल आणि इंटर्मिडीएट प्रोग्रामच्या जुन्या आणि नवीन प्रोग्रामसाठी ५ जुलैपासून परीक्षा घेण्यात येणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने जारी केलेल्या सूचनांनुसार, इंटर्मिडीएट (जुनी योजना) आणि इंटर्मिडीएट (नवीन योजना ) आणि अंतिम (जुनी आणि नवीन) व IRM, INTTAT सर्व परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. सीएच्या परीक्षा आधी २७ एप्रिलच्या परिपत्रकानुसार पुढे ढकलली होती. आधी या परीक्षा २१ आणि २२ मे रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र आता ही मे महिन्यातील परीक्षा ५ जुलैपासून घेतल्या जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. श्(ICAI CA Exams 2021: CA Intermediate and Final Exams will start from 5th July)

सीए फायनल, इंटर्मिडीएट परीक्षा पुढे ढकल्याण्याची घोषणा केली त्यावेळीस संस्थेने परिक्षा सुरु होण्याच्या किमान २५ दिवस आधी विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार सीए इंटर, अंतिम आणि पीक्यूसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याच्या नवीन तारखेच्या ४० दिवस आधीच संस्थेने महिती दिली आहे.

ICAI ने सीएच्या विद्यार्थ्यांचे ओरिएंटेशन कोर्स आणि IT ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. विद्यार्थी ३० जून आपली ट्रेनिंग पूर्ण करु शकतात. ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी आधी ३० मे ही तारिख देण्यात आली होती. सीए शिक्षण आणि प्रशिक्षण धोरणात विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किलचा अभ्यास करणे आवश्यक असते. ज्यात माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण (ITT) आणि ओरिएंटेशन कोर्सचा समावेश असतो. प्रत्येक विद्यार्थांला प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या १५ दिवस आधी रजिस्ट्रेशन करावे लागते.


हेही वाचा – JEE Advanced 2021: ३ जुलैला होणारी JEE advance परीक्षा पुढे ढकलली