ICAI CA Final Result 2022 : CA परीक्षेच्या निकालाची घोषणा; रिझल्ट तपासण्यासाठी काय कराल?

CA परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. ICAI ने या अंतिम निकालाची घोषणा केली असून विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन सहज पाहता येणार आहे. CA ची परीक्षा दोन टर्ममध्ये झाली असून ती देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 14 ते 29 मे 2022 या काळात घेण्यात आली होती.

निकाल तपासण्यासाठी काय कराल?
ICAI CA निकाल 2022 च्या अधिकृत वेबसाइट्स icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता. मात्र CA अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा अनुक्रमांक, नोंदणी क्रमांक किंवा पिन टाकून लॉग इन करणे गरजेचे आहे.

  • सर्वात आधी icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर वेबसाइटवरील “ICAI CA MAY 2022 RESULT” या लिंकवर क्लिक करा.
  • सुरू झालेल्या पेजवर तुमचा परीक्षा अनुक्रमांक, नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट करा.
  • आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.