सीए फाऊंडेशनच्या जून परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा ऑनलाइन निकाल

icai ca foundation result 2022 released at icai org know how to download

The Institute of Chartered Accountants of India (ICAI) ने सीए फाउंडेशनचा जूनमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज 10 ऑगस्ट 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर झाला. यामुळे सीए जून परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल तपासू शकतात आणि तो डाउनलोड करू शकतात. हा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सीए जून परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांच्या यशाची टक्केवारी 25.28 टक्के इतकी आहे. परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख यांच्या मदतीने लॉग इन करून अधिकृत वेबसाइटला भेट देत निकाल पाहू शकतात.

केव्हा झाली परीक्षा? 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया द्वारे सीए फाउंडेशनचे जूनमधील परीक्षा सत्र 24 ते 30 जून 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. सीए इंटरमिजिएट आणि सीए फायनल मे सत्र परीक्षेचा निकाल ICAI ने आधीच जाहीर केला आहे.

या वेबसाइट्सवर पाहा निकाल

  1. icaiexams.icai.org

2. icai.nic.in

3. icai.org

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

1) ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2) होमपेजवर जून सत्र परीक्षेच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.

3) आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.

4) या पेजवर मागितलेली माहिती प्रविष्ट करून लॉग इन करा.

5) आता तुम्हाला स्क्रीनवर निकाल दिसेल.

6) हा निकाल तुम्हा डाऊनलोड करत पुढील गरजांसाठी प्रिंट करू शकता.

पुढील प्रक्रिया काय असेल?

सीए फाउंडेशनच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या सर्व उमेदवारांना आता सीए इंटरमिजिएट परीक्षेचा फॉर्म भरावा लागेल. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 असेल. त्याचवेळी विलंब शुल्कासह विद्यार्थी 07 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतील. सीए नोव्हेंबरची परीक्षा 01 नोव्हेंबर 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार आहे.