Homeक्रीडाICC : या खेळाडूंना भर मैदानात वाद घालणे पडणार महागात, आयसीसी कारवाई...

ICC : या खेळाडूंना भर मैदानात वाद घालणे पडणार महागात, आयसीसी कारवाई करण्याच्या भूमिकेत

Subscribe

एडिलेड कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 82 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता आयसीसी मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड यांच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली : एडिलेड कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 82 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रेव्हिस हेडला बाद केल्यावर सिराजने रागामध्ये आनंद व्यक्त केला होता. यावेळी सिराजला आता हे सिलेब्रेशन करणे महागात पडले आहे. त्यामुळे आता आयसीसी मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड यांच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळत आहे. (Mohammed siraj and travis head may face icc disciplinary action after heated argument.)

हेही वाचा : Hindu Under Attack : मंदिराची निर्मिती भारतात; पण बांगलादेशी सैनिकांनी देशात घुसत थांबवले बांधकाम?

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये सामना सुरू असताना हा वाद झाला आहे. या कसोटीमध्ये सिराज खूपच रागामध्ये खेळत होता. मार्नस लबुशेननंतर त्याचा ट्रॅव्हिस हेडशी देखील वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र आता सिराज आणि हेडच्या वादाचे प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचले असून ते दोन्ही खेळाडूंवर कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आयसीसीने आता या प्रकरणाची दखल घेतली असून दोन्ही खेळाडूंना शिस्तभंगाच्या सुनावणीसाठी बोलवण्यात आले आहे. कॅमेऱ्यात टिपण्यात आलेल्या फुटेजनुसार आयसीसीच्या आचारसंहितेत फार मोठी शिक्षा नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : BCCI : जय शहा यांच्यानंतर सचिवपदी गांगुलीसोबत खास कनेक्शन असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती

- Advertisement -

ट्रॅव्हिस हेड भारताविरूद्ध 140 धावा करून खेळ खेळत होता, त्यानंतर सिराजने त्याला यॉर्करवर क्लीन बोल्ड केले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर दोघेही एकमेकांत वाद करताना दिसले आहेत. तसेच हेड आऊट झाल्यावर काहीतरी बोलला, त्यावर सिराजने प्रतिक्रिया दिली आणि ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत त्याला जाण्यासाठी सांगितले. तसेच यावेळी सिराज आक्रमकपणे आनंद साजरा करताना दिसला आहे. या मैदानावर त्याच्याबरोबरचे असे वागणे पाहून ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी बाऊंड्री लाईनवर सिराजला चिडवायला सुरुवात केली. त्यानंतर खेळाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही खेळाडू हे प्रकरण मिटवताना दिसले. सिराजने फलंदाजी करताना हेडशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर हा वाद संपल्याचे मानले जात आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -