घरक्रीडापावसाच्या हजेरीमुळे भारतीय महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

पावसाच्या हजेरीमुळे भारतीय महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

Subscribe

सिडनी येथे सुरू असलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार होता. परंतु पावसानाने अचानक हजेरी लावल्यामुळे सामना रद्द करावा लागला. याचा फायदा भारतीय महिला संघाला झाला असून भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

आज टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार होता. परंतु सिडनीत पावसाचा जोर कायम असल्यामुळे एकही चेंडूचा सामना झाला नाही. त्यामुळे अ गटातील अव्वल संघ म्हणून टीम इंडियाचा अंतिम फेरीत धडक मारली. भारत अंतिम फेरीत गेल्यानंतर देशभरातून आनंद व्यक्त केला जात आहे. भारताने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकले आणि उपांत्य फेरी गाठणाऱ्या पहिल्या संघाचा मान पटकावला. आयसीसीच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यावर गटातील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो. इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली.

- Advertisement -

आयसीसीच्या स्पर्धा नियमानुसार, पावसाच्या व्यत्ययानंतर किमान २- षटकांचा सामना होणे गरजेचे असते. यावेळी दोन्ही संघांना प्रत्येकी १० षटके मिळावीत. पण असे काही घडले नाही. त्यामुळे टीम इंडियाचा अंतिम फेरीत थेट प्रवेश निश्चित झाला आहे. भारताने अ गटात ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून त्याच्याच जोरावर भारताचा अंतिम फेरीत प्रवेश पक्का झाला आहे. मात्र, इंग्लंडच्या खात्यात ६ गुण होते. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ अद्याप अजिंक्य असला तरीही इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ तसेच २०१८ च्या विश्वचषकात भारताला हरवले आहे. त्यामुळे पुढील सामन्यात कोणता संघ वरचढ ठरतो का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -