घरताज्या घडामोडीम्युकॉरमायकोसिस बुरशीची लक्षण आणि परिणाम काय ? ICMR ने सुचविले Do's &...

म्युकॉरमायकोसिस बुरशीची लक्षण आणि परिणाम काय ? ICMR ने सुचविले Do’s & Don’t

Subscribe

म्युकॉरमायकोसिस (𝐌𝐮𝐜𝐨𝐫𝐦𝐲𝐜𝐨𝐬𝐢𝐬) हे एकप्रकारचे फंगल इन्फेक्शन म्हणजे काळ्या बुरशीचा आजार आहे. ज्या व्यक्तींना सहव्याधींनी किंवा इतर आजारांसाठीचे उपचार सुरू आहेत अशा व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यानेच या बुरशीच्या आजाराची लागण होते असे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या निमित्ताने तब्बल तीन दशकानंतर पुन्हा एकदा या आजाराच्या व्यक्ती समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये या आजाराचे रूग्ण आढळले आहेत. कोणत्या तरी आजाराने ग्रस्त असलेल्या किंवा सहव्याधी असलेल्या व्यक्तींमध्ये हवेतील विषारी बुरशीमुळे फुफ्फुसे आणि सायनसवर आघात होतो. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये म्युकॉरमायकोसिसचे काही रूग्ण आढळले आहेत. काही रुग्णांना डोळा गमवावा लागला आहे, तर काही रूग्णांचे प्राणही या बुरशीमुळे गेले आहेत. वेळीच निदान झाल्यानंतर आणि लगेच उपचार घेतल्यानंतर या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे मत इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने स्पष्ट केले आहे. म्युकॉरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा आजार झाल्यानंतर काय उपचार घ्यावेत, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नयेत तसेच या आजाराची लक्षणे कशी ओळखावीत याबाबतच्या सूचना ICMR मार्फत जारी करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

काय आहेत लक्षणे ?

या विषारी बुरशीमुळे परिणामी नाक, डोळ्यांभोवती सूज येते तसेच डोळेही लाल होतात. त्यासोबतच ताप, डोकेदुखी, कफ, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, रक्त्याच्या उलट्या होणे आमि मनासिक स्थिती बदलत राहणे यासारखे परिणाम होतात.

परिणाम का होतो ?

मधुमेह अनियंत्रित होण्यावर परिणाम
स्टेरॉईड्समुळे रोग प्रतिकारक शक्तीवर प्रभाव
सहव्याधींमुळे वाढ होणे

- Advertisement -

कसा प्रतिबंध कराल ?

– जर तुम्ही धुळीच्या संपर्कात किंवा त्यासारख्या कामाच्या ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा
– मातीमध्ये काम करत असाल तर पायात बूट, मोठी पॅंट आणि शर्ट, हातमोज्यांचा वापर करा
– वैयक्तिक स्वच्छता ठेवतानाच अंग घासून अंघोळ करणे गरजेचे आहे

कधी तपासणी कराल ?

– नाक बंद होणे, नाक खूपच गळणे, नाकातून काळ रक्त आल्यावर, नाकाचा शेंडा दुखू लागल्यावर
– चेहऱ्याच्या एकाच बाजुला दुखू लागणे किंवा सूज वाढल्यावर
– नाकावर काळे दिसून लागणे
– दात दुखणे, दात पडणे, जबडा दुखणे
– डोळ्यांना धूसर दिसणे किंवा डोळे दुखणे, ताप येणे
– छातीत दुखणे, श्वास घेण्यासाठी अडथळे निर्माण होणे

काय करावे ? (Do’s)

– हायपरग्लायसेमिया नियंत्रणात ठेवावा
– कोरोनामुक्तीनंतर तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासा
– मधुमेह असेल तर रक्तातील ग्लुकोज तपासत रहा
– स्टेरॉईड्सचा वापर आवश्यक तितकाच करा, त्यामध्ये योग्य वेळ, योग्य डोस आणि कालावधी असावा
– ऑक्सिजन थेरिपिमध्ये स्वच्छ आणि स्टराईल केलेल्या पाण्याचा वापर करा
– एन्टीबायोटिक्स आणि एन्टीफंगल्सचा वापर नियंत्रित पद्धतीने करा

काय करू नये ? (Don’t)

– सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
– नाक बंद होण्याची सर्व प्रकरणे ही विषाणूमुळे झालेली असतील अशी समजूत ठेवू नका
– ज्यांना कोरोनाची लागण होऊ न गेली आहे अशा व्यक्तींना या लक्षणांवर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे
– KOH स्ट्रेनिंग, मायक्रोस्कोपी, कल्चर, MALDI-TOF यासारख्या बुरशीच्या चाचण्यांचा वापर करा
– म्युकॉरमायकोसिसवर उपचार करण्याचा महत्वाचा वेळ गमावू नका

कसे नियंत्रण मिळवाल ?

– मधुमेह नियंत्रित ठेवा
– स्टेरॉईड्सचा वापर कमी करा
– इम्युनोमॉड्युलेटिंग ड्रग्जचा वापर बंद करा
– अॅन्टीफंगल प्रोफिलॅक्सिसचा वापर टाळा
– अॅन्टीफंगल थेरपीचा ४ ते ६ आठवड्यांचा उपचार घ्या


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -