घरCORONA UPDATEकोरोनाच्या उपचारासाठी 'गंगाजल' वापरण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव ICMR ने फेटाळला

कोरोनाच्या उपचारासाठी ‘गंगाजल’ वापरण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव ICMR ने फेटाळला

Subscribe

कोरोना उपचारांसाठी 'गंगाजल' वापरण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आयसीएमआरकडे पाठवला होता. मात्र आयसीएमआरने हा प्रस्ताव फेटाळला आहे.

कोरोना उपचारांसाठी ‘गंगाजल’ वापरण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) पाठवला होता. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हा प्रस्ताव फेटाळत कोरोनाशी लढण्यासाठी गंगाजल (गंगा नदीतील पाणी) चा वापर करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रस्तावावर विचार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने असं कोणतंही संशोधन करणार नसल्याचं सांगितलं. परिषदेचं म्हणणं आहे की यासाठी अधिक वैज्ञानिक आकडेवारीची आवश्यकता आहे. आयसीएमआरमधील संशोधन प्रस्तावांचे मूल्यांकन करणारे समितीचे प्रमुख डॉ वाय. के. गुप्ता म्हणाले की, सध्या उपलब्ध आकडेवारी कोरोना विषाणूच्या उपचारासाठी गंगा जलावर ​​संशोधन करण्यासाठी पुरेसे नाहीत.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की जलशक्ती मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन’ मधील विविध लोक आणि स्वयंसेवी संस्थेकडून कोविड-१९ रुग्णांच्या उपचारांमध्ये गंगा नदीच्या पाण्याचा वापर करण्याचे अनेक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. क्लिनिकल संशोधनाची विनंती केली गेली आहे. ते म्हणाले की हे प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठविण्यात आले आहेत. एम्सचे माजी प्रमुख गुप्ता म्हणाले, “सध्या या प्रस्तावांवर काम करण्यासाठी वैज्ञानिक आकडेवारी/वस्तुस्थिती, कल्पना आणि भक्कम संकल्पना आवश्यक आहे. याबाबत मंत्रालयाला कळविण्यात आलं आहे.”

- Advertisement -

गंगा मिशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रस्तावांवर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (एनईईआरआय) च्या वैज्ञानिकांशी चर्चा झाली. विशेष म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थने गंगा नदीचे विशेष गुणधर्म समजून घेण्यासाठी नदीची गुणवत्ता व गाळ यांचा अभ्यास केला होता.


हेही वाचा – विशाखापट्टणम वायू गळती: काय आहे नेमका स्टायरिन गॅस?

- Advertisement -

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार गंगेच्या पाण्यात आजार निर्माण करणाऱ्या जीवाणूंच्या तुलनेत विषाणूची संख्या खूप जास्त आहे. गंगा मिशन आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान वैज्ञानिकांनी असंही म्हटलं आहे की गंगेच्या पाण्यात किंवा गंगा नदिच्या गाळात अँटी-व्हायरस गुणधर्म आहेत याचा पुरावा नाही. “गंगेच्या पाण्यात बॅक्टेरिओफेज (Bacteriophage) हा निंजा विषाणू (Ninja Virus) आहे. बॅक्टेरिओफेज हा इतर धोकादायक विषाणूंना मारून टाकतो,” असं जलशक्ती मंत्रालयानं पत्रात म्हटलंय. दुसर्‍या प्रस्तावात असा दावा करण्यात आला आहे की शुद्ध गंगेचे पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, यामुळे विषाणूंविरूद्ध लढायला मदत होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -