घरCORONA UPDATEलसीचे दोन्ही डोस घेऊनही होतोय डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग; ICMR चा मोठा खुलासा

लसीचे दोन्ही डोस घेऊनही होतोय डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग; ICMR चा मोठा खुलासा

Subscribe

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोवर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जातोय. त्यामुळे कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR)चेन्नईतील एका अभ्यास असे आढळले की, कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊनही डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग होत आहे. याशिवाय यापूर्वी कोरोना संसर्ग न झालेल्या व्यक्तींनाही डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग होण्याचा धोका वाढतोय. ICMR, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉली आणि चेन्नई केंद्राद्वारे हे संशोधन करण्यात आले. त्यानंतर १७ ऑगस्टमध्ये ते एका जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

या अभ्यासात असे समोर आले की, डेल्टा किंवा बी.1.617.2 हे कोरोना व्हेरियंट लस घेणाऱ्या आणि न घेतलेल्या व्यक्तींनाही संक्रमित करतायत. त्यामुळे कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यात भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरियंटची अनेक प्रकरणे समोर आली. तर अनेक राज्यांमध्ये अद्यापही डेल्टाचे रुग्ण आढळतायत.

- Advertisement -

या अभ्यासात इतर संशोधनाचे देखील हवाला देण्यात आला. ज्यात डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गानंतर कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये न्यूट्रलाइजेशन टाइट्सचे प्रमाण कमी होतेय. यावर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे वैज्ञानिक जेरोमी थंगराज यांनी सांगितले की, चाचण्याची संख्या कमी असल्याने पुन्हा संसर्ग झालेल्या लोकांचा समावेश करण्यात आला नाही. कारण त्यांची संख्या खूप कमी होती. तसेच लसीकरणानंतर कोरोना संसर्ग झाला की नाही हे पुढे वर्गीकृत केले गेले नाही. लसीकरण केलेल्या लोकांमध्ये गंभीर रोगामुळे मृत होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होते.


खाजगी रेल्वेची ३० हजार कोटींची बोली प्रक्रिया भारतीय रेल्वेकडून रद्द


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -