coronavirus : तिसऱ्या फेजचा असा झाला अभ्यास, आज मोठी घोषणा होणार

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चमार्फत आज एक महत्वपूर्ण अशा अभ्यासाची घोषणा होणे अपेक्षित आहे

third phase

करोना पॉझिटीव्हचा भारतातला आकडा आता ४१५ पर्यंत पोहचला आहे. आज भारतात पसरणाऱ्या करोना व्हायरसच्या येत्या काळातील आकडेवारीची मोठी घोषणा होणे अपेक्षित आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या अभ्यासानुसार आज देशभरात पसरणाऱ्या करोना व्हायरची आकडेवारी कशी वाढक जाऊ शकते याची होस्ट की इन्फॉर्मेशन जाहीर होणार आहे.

आयसीएमआरने येत्या काही महिन्यात करोनाचा प्रसार कसा वाढू शकतो याचा एक महत्वपूर्ण अभ्यास पुर्ण केला आहे. आयसीएमआरकडून या अभ्यासातील महत्वाच्या गोष्टींची घोषणा आज होऊ शकते. पण सगळ्यात महत्वाच अपडेट म्हणजे भारतात करोना कम्युनिटी ट्रान्समिशन फेजमध्ये जाणार का ? याबाबतचा महत्वाचा खुलासा करण्यात येणार आहे. भारतात अजुनही तिसऱ्या टप्प्याची घोषणा झालेली नाही. मात्र आयसीएमआरमार्फत आज अनेक महत्वाच्या घोषणा होणार आहेत.

असा होतोय अभ्यास

आयसीएमआरने येत्या दिवसांमध्ये करोनाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी मॅथेमॅटिकल मॉडेलिंगचा वापर केला आहे. त्यामार्फतच करोनाचा येत्या महिन्यातला आकडा समोर येत आहे. आतापर्यंत भारतात कम्युनिटी ट्रान्समिशनची कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. पण काही केसेसमध्ये करोना पॉझिटीव्हच्या केसेसमुळे एक धोका आणि भीती निर्माण झाली आहे. गुजरातच्या सुरतमधील ६९ वर्षीय रूग्णाची कोणताही परदेशातील प्रवासाचा इतिहास नव्हता. पण या रूग्णाने दिल्ली आणि जयपूर येथे प्रवास केला होता. तर मुंबईतील एक हिरे व्यापाऱ्यानेसुद्धा भारतात कुठेही प्रवास केला नव्हता, तरीही हा रूग्ण करोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
भारतात २३ मार्चपर्यंत एकुण १८ हजार ३८३ नमुना चाचण्यांसाठीचे सॅम्पल १७ हजार ४९३ लोकांकडून गोळा करण्यात आले आहेत. तर देशात ४१५ जणांना करोनाची लागण झाल्याचा आकडा भारताने जाहीर केला आहे.