Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ICSE, ISC Result 2021: यंदा ICSE दहावीचे ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ISC...

ICSE, ISC Result 2021: यंदा ICSE दहावीचे ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ISC बारावीत ९९.७६ विद्यार्थी उत्तीर्ण

Related Story

- Advertisement -

आयसीएसई दहावी (ICSE 10th) आणि आयएससी बारावी (ISC 12th) परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सीआयएससीईच्या (CISCE) अधिकृत वेबसाईटवर पाहता येत आहे. यंदा आयसीएसई दहावीचे ९९.९८ टक्के विद्यार्थी , तर आयएससी बारावीचे ९९.७६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा आयसीएसईच्या १० वीचा निकाल नववीचे गुण आणि दहावीच्या अंतर्गत गुणांचे मुल्यांकन करत जाहीर करण्यात आला आहे. तर १२ वीचा निकाल ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांवर आधारित आहे.

यंदा ICSE या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी देशभरातून २ लाख १९ हजार ४९९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १ लाख १८ हजार ८४६ मुलं, तर १ लाख ६५३ मुली होत्या. तर ISC बारावीच्या परीक्षेसाठी ९४,०११ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यापैकी दहावीत ९९.९८ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर ०.०३ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. याशिवाय बारावीत ९९.७६ विद्यार्थी पास झाले आहेत. तर ०.२४ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत.

कुठे आणि कसा पाहता येईल रिजल्ट?

- Advertisement -

१) विद्यार्थी www.cisce.org आणि www.results.cisce.org या दोन वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

२) होमपेजवर ‘Results 2021’ यावर टॅप केल्यानंतर ICSE/ISC Year 2021 असे दोन पर्याय दिसतील.

- Advertisement -

३) यातील तुम्हाला दहावी किंवा बारावी जो निकाल पाहायचा तो पर्याय निवडा.

४) यानंतर विद्यार्थ्यांला त्याचा युनिक आयडी, इंडेक्स क्रमांक आणि स्क्रिनवर आलेला कॅपचा कोड टाकत लॉगइन करावे लागेल.

५) आता तुमच्या स्क्रिनवर तुमचा निकाल दिसेल.

६) त्यानंतर त्याखालील डाउनलोड पर्यायावर क्लिक करत तुम्ही निकाल डाउनलोड करु शकता.

७) एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. विद्यार्थ्याला यासाठी ICSE असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करावा लागेल. आता हा मेसेज ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तात्काळ रिझल्ट दिसणार आहे.

८) तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी ISC असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ – या क्रमांकावर पाठवा.


 

- Advertisement -