घरदेश-विदेशनोकरीची संधी! IDBI बँकेत 'या' १३४ पदांसाठी होणार मोठी भरती

नोकरीची संधी! IDBI बँकेत ‘या’ १३४ पदांसाठी होणार मोठी भरती

Subscribe

आयडीबीआय बँकने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी वॅकेन्सी सुरू

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असताना आयडीबीआय बँकने मोठी भरती काढून बेरोजगार असलेल्यांसाठी सुवर्ण संधी निर्माण केली आहे. आयडीबीआय बँकने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी वॅकेन्सी सुरू केली असून इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२० आहे.

या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे एकूण १३४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी २४ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आणि ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२० पर्यंत असणार आहे.

- Advertisement -

‘या’ पदांसाठी होणार भरती

डीजीएम (ग्रेड डी) – ११ पद, एजीएम (ग्रेड सी) – ५२ पद, मॅनेजर (ग्रेड बी) – ६२ पद, असिस्टेंट मॅनेजर (ग्रेड ए) – ९ पद असणार आहे. कोणत्याही पदासाठी निवड करताना, उमेदवाराचे शिक्षण आणि अनुभव याचं स्क्रिनिंग केले जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्यांना ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल.

सामान्य वर्गातील उमेदवारांना ७०० रुपये फी भरावी लागेल. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी १५० रुपये फी आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार आयडीबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर idbibank.in ला भेट देऊ शकतात.

  • उमेदवाराने फी भरल्यानंतरच रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचे मानले जाईल.
  • कोणताही उमेदवार केवळ एकाच पदासाठी, एका वॅकेन्सीसाठी अर्ज करू शकतो.
  • उमेदवारांनी याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी केवळ बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरच idbibank.in विश्वास ठेवाव
  • या पदांअंतर्गत निवड झाल्यास, उमेदवाराची पोस्टिंग देशभरात कुठेही केली जाऊ शकते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -