घरताज्या घडामोडीभारतीय युजर्सना भेडसावतोय आयडेंटिटी थेफ्टचा धोका!

भारतीय युजर्सना भेडसावतोय आयडेंटिटी थेफ्टचा धोका!

Subscribe

भारतातील दर १० पैकी किमान चार युजर्सना म्हणजे जवळपास (३९ टक्के) ओळख चोरली जाण्याचा (आयडेंटिटी थेफ्ट) अनुभव आला आहे. यातील १० टक्के जणांना तर हा अनुभव मागील एका वर्षातच आला आहे. नॉर्टनलाईफलॉक या ग्राहक सायबर सुरक्षेतील कंपनीने त्यांचा वार्षिक सायबर सेफ्टी इनसाइट अहवाल आज प्रसिद्ध केला आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार ६१ टक्के प्रतिसादकर्त्यांना आयडी थेफ्ट, म्हणजेच ओळख चोरली जाण्यासंदर्भात आपण सुरक्षित आहोत असे वाटते, तर ६३ टक्के जणांना आयडेंटिटी थेफ्टच्या प्रकरणात काय करावे, याची काहीच कल्पना नाही. तीन चतुर्थांशांपेक्षा अधिक (७९ टक्के) जणांना वाटते की, असे काही झाले तर काय करावे, याबाबत त्यांच्याकडे अधिक माहिती असायला हवी होती.

६६ टक्के जणांनी १२ महिन्यांत सायबर गुन्ह्यांचा घेतला अनुभव

आयडेंटिटी थेफ्ट आणि सायबर गुन्हे महिलांच्या तुलनेत पुरुषांसोबत अधिक घडतात असेही अहवालातून उघड झाले आहे. ८० टक्के युजर्सने आयुष्यात कधी ना कधी सायबर गुन्ह्यांचे बळी ठरल्याचे सांगितले. यातील दोन तृतीयांश (६६ टक्के) जणांनी मागील १२ महिन्यांत सायबर गुन्ह्यांचा अनुभव घेतला आहे.

- Advertisement -

“आयडेंटिटी थेफ्ट. डेटा ब्रीचेस आणि ऑनलाइन फसवणूक अशी प्रकरणे सध्या चर्चेत आहेत आणि खासगी माहिती सुरक्षित ठेवण्याचे गांभीर्य आपण समजून घ्यायला हवे. आता तशी अटीतटीची वेळ आली आहे,” असे नॉर्टनलाईफलॉक, इंडियाचे भारतातील संचालक रितेश चोप्रा म्हणाले. इतर देशांच्या तुलनेत भारतीय ग्राहक आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होईल, यासंदर्भात फारच जागरुक असतात, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच, माहिती देण्याच्या बदल्यात काही मिळणार असेल तर ते खासगी माहितीही देऊ करतात. १० पैकी फक्त एका प्रतिसादकर्त्याने (१४ टक्के) सर्व प्रायव्हसी पॉलिसी स्वत: वाचत असल्याचे सांगितले. इतकेच नाही, जागतिक ग्राहकांच्या तुलनेत खालील प्रसंगात भारतीय ग्राहकांना फारसे काही चूक वाटत नाही.


हेही वाचा – CoronaVirus: लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना पेपरलेस पद्धतीने मिळणार सीमकार्ड!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -