Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम कलकत्ता उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपसंदर्भात नोंदविले महत्त्वाचे निरीक्षण

कलकत्ता उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपसंदर्भात नोंदविले महत्त्वाचे निरीक्षण

Subscribe

मुंबई | “लिव्ह-इन रिलेशनशिपमधील (Live-in Relationship) पार्टनरला त्याचा विवाह आणि मुलांबद्दल सांगितले असेल तर, त्याला फसवणूक म्हणू शकत नाही”, असे महत्त्वाचे निरीक्षण कलकत्ता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) एका सुनावणीदरम्यान नोंदविले आहे. एका हॉटेल एक्झिक्युटिव्हला (Hotel Executive) त्यांच्या लिव्ह-इन पार्टनरला फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी १० लाख रुपयांचा दंड कनिष्ठ न्यायालयाने ठोठावला होता. आरोपीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत ११ महिने राहिल्यानंतर विवाह करण्यास नकार देत ब्रेकअप केला होता. महिलेने एफआयआर दाखल करत न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा कनिष्ठ न्यायलायने महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात आरोपी (हॉटेल एक्झिक्युटिव्ह) पार्टनरने कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले. याचिकेवर सुनावणी करणारे न्यायमूर्ती सिद्धार्थ रॉय चौधरी यांनी आपल्या निकालत म्हटले की, आयपीसीच्या कलम ४१५ नुसार फसवणूक म्हणजे जाणून बुजून एखाद्याला खोटे सांगणे किंवा एखाद्या व्यक्तिचा विश्वसाघात करणे, असे असते. परंतु, यात आरोपीने महिलेला विवाहचे खोटे आश्वास दिल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

महिलेने २०१५ साली कलकाता येथील प्रगती मैदान पोलीस ठाण्यात लिव्ह-इन पार्टनर विरोधात एफआयआर दाखल केली होती. या तक्रारीत महिलेने म्हटले की, फेब्रुवारी २०१४ मध्ये एका हॉटेलमध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी गेली असता तिथे तिची भेट हॉटेल मॅनेजरशी झाली. यानंतर हॉटेल मॅनेजरने तिचा नंबर मागितला, आणि महिलेने तो दिला. पहिल्या भेटीत आरोपीने महिलेला त्यांच्या मोडलेल्या विवाहसंदर्भात खरी माहिती सांगितली. त्यानंतर मॅनेजरने महिलेला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासंदर्भात विचारणा केली होती. यानंतर महिलेने देखील होकार दिला होता. यासंदर्भात महिलेच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, हे तिच्या पालकांना देखील माहिती होती. महिलेच्या पालिकांनी तिला लवकरात लवकर विवाह करून सेटल व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

- Advertisement -

महिलेने दाखल केली लिव्ह-इन पार्टनरविरोधात एफआयआर 

आरोपी मुंबईत पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर मुंबईहून कलकता येथे परतल्यावर आरोपीने लिव्ह-इन पार्टनरला सांगितले की, आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा विचार त्याने बदलला आहे. यानंतर आरोपीने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिला पार्टनरची फसवणूक आणि बलात्काराची एफआयआर पोलिसात दाखल केली होती. या प्रकरणात अलीपूर न्यायालयाने आरोपीला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. यात, ८ लाख लिव्ह-इन पार्टनला आणि २ लाख रुपये तिजोरीत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

 

- Advertisment -