Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश CIBIL Score कमी असेल तर लोन घेण्यात येऊ शकते अडचण, जाणून घ्या...

CIBIL Score कमी असेल तर लोन घेण्यात येऊ शकते अडचण, जाणून घ्या कसा वाढवाल सिबिल स्कोअर..

CIBIL स्कोअर आणि क्रेडिट स्कोअर हे दोघही समान आहेत, हे तीन अंकांनी ठरवले जातात.

Related Story

- Advertisement -

अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा(credit card) वापर खूप वेगाने वाढला आहे. सध्याच्या युगात, लोक रोख रकमेपेक्षा क्रेडिट कार्ड वापरणे पसंत करतात(digital payment), किराणा बिलांपासून ते रेस्टॉरंट बिलापर्यंत, प्रत्येक गोष्ट क्रेडिट कार्डने भरली जात आहे. क्रेडिट कार्डची मागणी लक्षात घेऊन, त्याची उपलब्धता देखील अगदी सोपी झाली आहे. नोकरदार लोकांना बँकांकडून क्रेडिट कार्ड ऑफरशी संबंधित कॉल येत राहतात. अनेक बँकेतर्फे लोकांना फुकट क्रेडिट कार्डची ऑफर देण्यात येते तसेच लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याचा संबधी माहिती देण्यात येते.मात्र जर तुमचे सिबिल स्कोर कमी असणार तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. जर तुम्हाला लोन काढायचं असेल तर तुमचा चांगला CIBIL स्कोअर असणे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल, तेव्हा बँका तुम्हाला क्रेडिट कार्डावर लोन देऊ शकते. CIBIL स्कोअरसाठी 30/25/20 फॉर्म्युला आवश्यक आहे. सिबिल स्कोर म्हणजे काय हे आपण सर्वात आधी जाणून घेऊया.(If CIBIL Score is low, it may be difficult to get a loan. how to increase CIBIL score )

सिबिल स्कोर म्हणजे काय?

CIBIL स्कोअर आणि क्रेडिट स्कोअर हे दोघही समान आहेत, हे तीन अंकांनी ठरवले जातात. CIBIL स्कोअर 300 ते 900 पर्यंत असू शकतो. सिबिल स्कोअरमध्ये व्यक्तीने घेतलेल्या लोन संबधीत माहती उपलब्ध असते. क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितका चांगला मानला जातो.

- Advertisement -

 

Goodmoneying.com मधील सर्टिफाएड फाइनॅशियल प्लानर आणि SEBI रजिस्टर्ड इन्वेस्टमेंट एडवाइजर मणिकरन सिंघल यांच्या म्हणण्यानूसार, कोणत्याही क्रेडीट कार्ड धारकाकडे त्याचं सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचं आहे. सिबिल स्कोर वाईट असणे हे त्या व्यक्तीच्या जुन्या लोन बद्दल मापदंड दर्शवतात. हे व्यक्तीचा मागील क्रेडिट इतिहास दर्शवते. CIBIL स्कोअर खराब असला तरीही क्रेडिट कार्ड अर्जदाराचे बँकेशी चांगले संबंध असल्यास क्रेडिट कार्ड मिळू शकते. ते म्हणाले की CIBIL स्कोअर व्यतिरिक्त, बँका क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी बँक ठेवींवर देखील लक्ष ठेवतात.

- Advertisement -

CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.एकाच वेळी अनेक कर्ज घेणे टाळा. वेळेवर कर्ज फेडा, क्रेडिट मर्यादा कमी होऊ देऊ नका.


हे हि वाचा – LIC Policy : जमा करा फक्त 1302 रुपये आणि मिळवा 27.60 लाख, वाचा सविस्तर..

- Advertisement -