CoronaVirus: मास्क न लावल्यास ‘या’ देशात तब्बल ८ लाख रुपये दंड!

Why and how is the mask effective in limiting the spread of Covid 19?

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊन दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी सतत हँडवॉशने हात धुवायला आणि मास्क घाला, अस प्रत्येक देशातील सरकार लोकांना आवाहन करत आहे. अनेक देशात मास्क लावणे बंधनकारक केले आहे. दरम्यानच मास्क न लावण्यामुळे तब्बल ८ लाखांचा दंड आकारण्याची कारवाई एका देशाने केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जर्मनी देशात कायदे कडक करण्यात आले आहेत.

आतापर्यंत जर्मनीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ५९ हजारहून अधिक झाली आहे. तर मृतांचा आकडा ६ हजारहून अधिक झाला आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जर्मनीने कायदे कडक केले आहेत. जर्मनीत नव्या नियमानुसार सार्वजनिक वाहतूक करताना आणि दुकांनात सामान खरेदी करताना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. जर्मनीत १६ पैकी १५ राज्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमाचे उल्लंघन केल्यास २५ युरो ते १० हजार युरो म्हणजे २ हजारांपासून ते ८ लाख २५ हजारापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

जगात आतापर्यंत ३१ लाख ४७ हजार ६२६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ लाख १८ हजार १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ९ लाख ६१ हजार ८७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – एअर इंडियाच्या लिलावाला दुसऱ्यांदा मुदतवाढ